सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोदी-पवार स्नेही , काँग्रेस ची वर झाली भुवई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेह येथील लष्करी तळावर जाऊन सैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय योग्यच होता, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले

Aishwarya Dubey
  • Jul 7 2020 11:17PM
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेह येथील लष्करी तळावर जाऊन सैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय योग्यच होता, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह येथील दौऱ्याचे समर्थन केले. १९६२ साली युद्धाप आपला पराभव झाला होता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण हेदेखील प्रत्यक्ष सीमारेषेवर LAC गेले होते. या दोघांनीही भारतीय सैनिकांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. आपल्या सध्याच्या पंतप्रधानांनीही तेच केले. जेव्हा अशाप्रकारचा प्रसंग उद्भवतो तेव्हा देशाच्या नेतृत्त्वाने सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचललीच पाहिजेत, असे शरद पवार यांनी सांगितले.  लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे याबाबत माहिती नाही. मात्र १९६२ च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावेला ४५ हजार चौकिमीचा भाग चीनच्या ताब्यात आहे. तो भाग अद्याप आपल्याला मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे आरोप करताना आपण भूतकाळात काय केले आहे, याचा विचार झाला पाहिजे, असेही शरद पवार यांनी म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी मोदींच्या कृतीचे समर्थन केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार