सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पारनेर मधील महाविकास आघाडीची धुरा आमदार निलेश लंके यांच्याकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुतोवाच

पारनेर नगरपंचायतीतील त्या पाच नगरसेवकांनी पुन्हा बुधवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले.

Rao saheb
  • Jul 10 2020 6:47PM
पारनेर नगरपंचायतीतील त्या पाच नगरसेवकांनी पुन्हा बुधवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांनी पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले. यापुढे हे सर्व नगरसेवक आ. लंके यांच्याच नेतृत्वाखाली काम करतील. त्याचबरोबर पारनेर तालुक्यामधील महाविकास आघाडीची धुरा सुद्धा त्यांच्यावरच असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आ. निलेश लंके यांच्या नेतृत्वावर एक प्रकारे सुतोवाच केला.

पारनेर नगर पंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. यामुळे महाविकास आघाडी मध्ये आलबेल नाही अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान याचा फायदा विरोधकांना होऊ नये या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आमदार निलेश लंके हे पाचही नगरसेवकांना घेऊन बुधवारी मुंबईत आले. अगोदर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आ. लंके शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत नगरसेवकांना घेऊन मातोश्रीवर पोहोचले. त्याठिकाणी जवळपास चाळीस मिनिटे बैठक चालली. नगरसेवकांनी स्थानिक शिवसेना नेतृत्वाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर यापुढेही आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार म्हणून लंके यांच्याकडे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी कायम आबाधित राहिल. त्यासाठी स्थानिक पातळीवर सुद्धा आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.


या पाठीमागे जे काही झाले असेल ते सोडून द्या. आता आपण महाविकास आघाडीत काम करत आहोत. निलेश तू आपला घरचा माणूस आहे. तुझे काम सुद्धा खूप चांगले आहे. तुला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. कधीही कोणतेही काम घेऊन तू मला भेटायला येऊ शकतोस असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगतात. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आ. लंके भावूक झाले.
तुमाला मातोस्त्रीचे दरवाजे कायम खुले आहेत असेही ठाकरे यावेळी  म्हनाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार