सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लॉक डाउन काळातही साकुर पठारभागातुन मोठ्या प्रमानात वाळूऊपसा...

वाळुतस्करांचे पोलीस,महसूल खात्यासोबतच्या आर्थिक सबंधांपुढे सरपंच हतबल.....

Aishwarya Dubey
  • Jul 17 2020 5:05PM
अहमदनगर
संगमनेर
 वाळुतस्करांचे पोलीस,महसूल खात्यासोबतच्या आर्थिक सबंधांपुढे सरपंच हतबल.....

साकुरपठार भागात मोठ्या प्रमाणावर वाळु उपसा सुरू आहे. अधिकारी मात्र जाणुन बुजुन या सगळ्या कडे काना डोळा करत असल्याचे दिसून येत आहे. आंबी ,घारगाव ,खैरदरा, जाबुंत, साकुर या ठिकाणाहून जोरदार वाळु उपसा चालु आहे दिवसा ढवळ्या पोकलन , जेसीबी  च्या साह्याने हा गोरखधंदा ह्या परिसरात चालु आहे . अधिकारी वर्गाच अजिबात लक्ष नाही. अधिकारी सामील असल्याचा चर्चा सुरू आहे. ह्या सगळ्यात तरुण पिढी गैर मार्गाला जात आहे, हे सगळे होतकरु तरुन आहे यांनी दुसरा व्यवसाय निवडावा आपले जिवन चांगल्या पद्धतीने सुखकर जगावे. आपल्या पुढील पिढीचा विचार करावा, पाण्याची पातळी अतिशय कमी होत आहे, पुढच्या पिढीच भविष्य अंधारमय आहे. चोरीचा माल असल्या कारणाने गाड्या ,ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवत आहेत. जवळच नाशिक हाईवे शेजारी  घारगाव पोलीस असुन त्या मार्गावरूनच ह्या गाड्या जात असतात परंतु झोपेचे सोंग व आर्थिक साटेलोटे असल्याने पोलीसांपुढे कानाडोळा करन्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
                  महसुल खात्यातील  ,तलाठी ,चपराशी,,तहसिलदार कार्यालय पासुन सर्वांनाच वाळुची मलई मिळत असल्याने सर्वच चिडीचुप   असतात.
           जर सरपंच व पोलीस पाटलांनी तक्रार केली तर त्यांना धमकावले जाते.गावकरी सरपंच व पोलीस पाटलांनाच जबाबदार धरतात तेव्हा सरकारने सरपंचांना पोलीस संरक्षन दिले पाहीजे अशी ईच्छा जांबुत चे सरपंच ऊतम बुरके यांनी व्यक्त केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार