सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पनवेल वाहनचालकांना लुटणाऱ्या सराईत टोळीला पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड

पनवेल वाहनचालकांना लुटणाऱ्या सराईत टोळीला पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड ; उरणमधील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात.

Manish Gupta
  • Jul 23 2020 7:05PM
पनवेल - पनवेल शहरालगतच असणाऱ्या उड्डाणपुलावर एका रुग्णवाहिका चालकाला लुटणाऱ्या अज्ञात आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखे पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर या टोळीतील आरोपी हे उरण येथील असून तेथील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. यातील एका आरोपीवर सन 2002 पासून आत्तापर्यंत उरणमध्ये 7 गुन्हे दाखल आहेत.           
काही दिवसांपूर्वी पनवेल शहराजवळील विजय सेल्स समोरील उड्डाणपुलावर चढण्याच्या मार्गांवर आपल्या ताब्यातील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घेऊन गजानन बाबाजी वळवी (41) हे जात असताना रुग्णवाहिका बंद पडली म्हणून बाजूला उभे होते. याचवेळी याठिकाणी रिक्षा क्रमांक  एम एच 46 एझेड 5108 मधून बंडाप्पा शिवानंद वीरशेट्टी वय ४० वर्ष , रा . इंदिरानगर झोपडपट्टी, दयाशंकर श्रीरंग राऊत ,वय ३० वर्ष, राजेश शंकर राठोड ,वय ३२ दोन्ही रा. उरण (सध्या रा पनवेल बसस्टॅण्ड ब्रिजखाली)  हे तिथे आले आणि त्यांनी गजानन वळवी यांच्याशी झटापट करून त्यांच्याकडील एमआय कंपनीचा 5000 रुपये किमतीचा मोबाईल, अँपल कंपनीचा 20 हजार रुपये किमतीचा आयपॅड आणि खिशातील चॉकलेटी रंगाच्या पाकीटासह त्यातील 18 हजार रुपये अशी रोकड असा एकूण 43 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यावेळी गजानन वळवी यांनी तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली. यावेळी सदर आरोपींना फिर्यादी हे ओळखत नसल्यामुळे पोलिसांसमोर या आरोपींना पकडण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, पोनी गुन्हे विजय तायडे, पोनी प्रशा शत्रुघ्न माळी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरण पथकाचे  सपोनि निलेश राजपूत, पो उप  निरी सुनिल तारमळे, पोहवा वाघमारे, पोहवा आयरे, पोना वाघमारे, पोना शिंदे, पोशि गर्दनमारे, पोशी घुले, पोशी परासुर, पोना खेडकर, पोशी आव्हाड, पोना माने, पोना चौधरी, पोना पवार यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरु केला. त्यानुसार बंडाप्पा शिवानंद वीरशेट्टी वय ४० वर्ष , रा . इंदिरानगर झोपडपट्टी पनवेल यास प्रथम अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली १,२५,०००/-  रु. ऑटो रिक्षा, २०,००० रु. ॲपल आयपॅड, ५०००/- रु. चा मोबाइल असा एकूण ₹ १,५०,०००/- चा माल हस्तगत  करण्यात आला त्यानंतर उर्वरित आरोपी दयाशंकर श्रीरंग राऊत ,वय ३० वर्ष, राजेश शंकर राठोड ,वय ३२ दोन्ही रा. उरण (सध्या रा पनवेल बसस्टॅण्ड ब्रिजखाली) याना सापळा रचून अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल तारमळे करीत आहेत.            

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार