भर पावसात अतिरिक्त जिल्हाआधिकारी यांची हदगांव शहरात कोरोनाच्या बाबतीत जनजागृती
हदगांव शहरात नादेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाआधिकारी हे गुरुवारी दिवसभरात उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय, तसेच कोईड सेंटरला भेट दि
हदगाव दि.१०( अरविंद जाधव) हदगांव शहरात नादेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाआधिकारी हे गुरुवारी दिवसभरात उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय, तसेच कोईड सेंटरला भेट दिली. विशेष म्हणजे या बाबतीत अतिरिक्त जिल्हाआधिकारी यांच्या भेटी बाबतीत माञ स्थानिक पञकाराना माहीती देण्यात आलेली नाही. या शहरासह परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
४ वाजेदरम्यान अतिरिक्त जिल्हाअधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, व न.पा चे मुख्यअधिकारी यांनी शहरात धोधो पाऊस पडत असतांना छोट्या स्पिकर द्वारे शासकीय आरामदायी वाहनात माञ ‘कोरोना’ विषयी, आलावसिंग न.पा. चे मुख्यधिकारी विजय येरावाड हे करतांना दिसुन आले. विशेष म्हणजे शहरातील व काही परिसरातील नागरिक व ञस्त शेतकरी अतिरिक्त जिल्हाअधिकारी यांना भेटण्यासाठी ताटकळत होते. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही.
दिवसभरात उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयामध्ये विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली असल्याची माहीती मिळाली. पीककर्जा संबधी अनेक तक्रारी व मागील परतीच्या पावसाचे अनुदान तसेच बोगस बियाणे शहरातील बँकाच्या बाबतीत अतिरिक्त जिल्हाअधिकारी आढावा घेतील अशी अपेक्षा होती. माञ ती फोल ठरली अतिरिक्त जिल्हाअधिका-याच हदगाँव तालुक्याचा दौ-याची माहीती मिळताच अनेकांनी तहसिल कार्यालय कडे धाव घेतली, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प