आशिष शेलार चा उद्धव ला 'ढ' चा टोला
कृषी शाखेतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-१९ असा शिक्का असल्याच्या बातमीने मंगळवारी चांगलीच खळबळ माजवली
कृषी शाखेतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-१९ असा शिक्का असल्याच्या बातमीने मंगळवारी चांगलीच खळबळ माजवली. ही गोष्ट समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ही बाब अत्यंत चुकीची, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. आम्ही सूचना केल्या की लगेच सरकारच्या अंगाला सुया टोचतात. विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून आम्ही एवढे दिवस हेच सांगत होतो. 'ढ' कारभार सगळा, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी सरकारला लगावला.
राज्यात राज्यात कृषी महाविद्यालयाचे २८००० विद्यार्थी आहेत. अमरावतीतील एका कृषी विद्यालयाने २४७ विद्यार्थींना कोविड १९ चा शिक्का असलेले प्रमाणपत्र दिले आहे. ही चूक ज्यांनी केलीय त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासनही भुसे यांनी दिले आहे. तसेच २४७ विद्यार्थ्यांना दिलेली कोविड- १९ ची प्रमाणपत्रे परत घेतली जातील आणि त्यांना कोविडचा शिक्का नसलेली नवीन प्रमाणात दिली जातील, असेही त्यांनी सांगितले
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प