सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कसा मुंबईत घसरला कोरोना

मुंबईच्या २४ विभागांपैकी १७ विभागातील कोरोना रुग्णावा वेग आता दीड टक्क्याच्या खाली आला आहे

Aishwarya Dubey
  • Jul 14 2020 8:00PM
मुंबईच्या २४ विभागांपैकी १७ विभागातील कोरोना रुग्णावा वेग आता दीड टक्क्याच्या खाली आला आहे. यापैकी काही विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्याही खाली आहे. सध्याच्या घडीला या १७ विभागांमध्ये १.३४ टक्क्याच्या सरासरीने रुग्ण वाढत आहेत. तर उर्वरित सात विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर २.५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. 

मुंबईतीलो कोरोनाचा डबलिंग रेट महानगपालिकेने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षाही वर जाऊन पोहोचला आहे. सध्या मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५२ दिवस इतका आहे,  यामध्ये एच पूर्व विभागाची लक्षणीय कामगिरी सुरूच असून या विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल १६४ दिवसांचा झाला आहे. तर रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता ०.४ टक्के असा सर्वात कमी आहे. एच पूर्व विभागात वांद्रे पूर्व, वाकोला, कलानगर आणि सांताक्रुझ या भागांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबईत दररोज कोविड रुग्ण वाढीचा सरासरी दर १ जुलै  रोजी १.६८ टक्के होता. हा दर १२ जुलै रोजी १.३६ टक्क्यांपर्यंत घसरला. याचाच अर्थ रुग्ण वाढ मंदावत असून प्रशासन आपले घोषित लक्ष्य गाठण्यात यशस्वी होताना दिसत आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार