सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माहूर गड श्री दत्त शिखर संस्थान येथे गुरू पोर्णिमा साजरी.

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज सरकारने राज्यातील सर्वच धार्मीक स्थळ भाविकांसाठी बंद केले आहेत.

Aishwarya Dubey
  • Jul 5 2020 4:56PM
माहूर (जिल्हा नांदेड) दि.5 (अरविंद जाधव) कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज सरकारने राज्यातील सर्वच धार्मीक स्थळ भाविकांसाठी बंद केले आहेत. त्यात माहूर येथील रेणूकामाता मंदीर आणि माहूर गडावरील श्री दत्तशिखर संस्थान दर्शनासाठी बंद आहे. मात्र रविवारी (ता.पाच) संस्थानचे महंत श्री मधुसुधनजी भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरू पोर्णिमा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे नेहमी गुरूपोर्णिमा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी केली जाते. पण यावर्षी कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे गडावरील सर्व मंदीर ता. १७ मार्चपासून भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्यात आली आहेत. ती आजपर्यंत बंदच आहेत.

गुरू पोर्णिमेच्या महापुजेस प्रारंभ

रविवारी (ता. पाच) सकाळी सहा वाजता श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसुधनजी भारती महाराज यांनी गुरू पोर्णिमेच्या महापुजेस प्रारंभ केला. श्री भगवान दत्तप्रभुंची पुजा केल्यानंतर मंदीर परिसरातील समाधी व देवदेवतांची पुजा केली. महंत श्री मधुसुधनजी भारती महाराज हे पुजेनंतर परंपरागत महंताच्या गादीवर विराजमान झाले. त्यांचे पुजन पुजारी वासुदेव भारती महाराज यांनी केले. त्यानंतर महंतानी उपस्थितांना प्रसाद दिला. त्यानंतर महाआरती करण्यात आली.
यावेळी महापुरुष वासुदेव भारती महाराज, धनराज भारती महाराज, चिंतामन भारती महाराज, वामन भारती महाराज, हरीहर भारती महाराज, चिरंजीव भारती महाराज, संस्थानचे विश्वस्त गणेशराव पाटील, विश्वस्त धनंजय महाजन, विश्वस्त विश्वासराव माने, विश्वस्त गोपाल भारती, विश्वस्त अॅड. निलेश पावडे, विश्वस्त अॅड. आशिष देशमुख, व्यवस्थापक अॅड. सुदर्शन देशमुख यांच्यासह संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द

नांदेड जिल्ह्यातील माहूर गड हे अनेकांचे श्रध्दास्थान आहे. रेणूका मातेचे दर्शन घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संजय राठोड यांच्यासह आदी मंत्रीगण येथे दर्शनासाठी येतात. जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून रेणूका गडाकडे पाहिल्या जाते. निसर्गरम्य असे ठिकाण असून पर्यटनस्थळ सुद्धा आहे. या गडाच्या विकासासाठी शासन मोठा खर्च करते. नवरात्रमध्ये एक महिणा या ठिकाणी भाविकांची मांदीयाळी असते. जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास दीडशे किलोमिचटर अंततरावर असलेल्या माहूर देवस्थानाला राज्यासह तेलंगना, मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून भाविक येतात. दत्त मंदीर आणि रेणूका मातेचे दर्शन घेतल्यानंतर मनशआंती मिळते असा अनेकांचा समज आहे. म्हणून या देवस्थानाला जागृत देवस्थान असे म्हणतात.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार