सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बॅरिकेटिंगजवळ थेट प्रक्षेपणाने खोडाई देवीच्या दर्शनाची व्यवस्था अखेर हिंदुत्वनिष्ठ पदाधिकारींच्या आंदोलनाला यश

अखेर हिंदुत्वनिष्ठ पदाधिकारींच्या आंदोलनाला यश

Nandurbar MH
  • Oct 24 2020 1:06PM
नंदुरबार- नंदनगरीतील ग्रामदेवत खोडाई देवीचे मुखदर्शन भाविकांसाठी खुले करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ डॉ.नरेंद्र पाटील व मयूर चौधरी यांनी आज दि.२३ ऑक्टोंबर रोजी मंदिराच्या १०० मीटर बॅरिकेटिंग समोरच बसुन अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. देवीच्या मुखदर्शनाची मागणी लावुन धरल्याने अखेर पोलिसांनी गेट जवळच एलएडीची मोठी स्क्रीन लावून खोडाई देवीच्या दर्शनासाठी थेट प्रक्षेपण करण्याची सोय केल्याने लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.
 
 
नवरात्रोत्सवाला सुरुवात झाल्याने खोडाई देवीच्या परिसरात प्रशासनाने बॅरिकेटिंग करून मंदिरात जाण्यास बंदी केली आहे. यामुळे नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनापासून भाविकांना वंचित राहावे लागत आहे. देवीचे बाहेरून तरी मुखदर्शन होऊ द्यावे, यासाठी भाविकांच्या वतीने हिंदूत्वनिष्ठ संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने आज दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेपासून डॉ.नरेंद्र पाटील व मयूर चौधरी यांनी खोडाई देवी मंदिरापासुन
१०० मीटर अंतरावर असलेल्या बॅरिकेटिंगसमोर बसुन अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. दरम्यान पोलिसांनी या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. तेथेही त्यांनी उपोषण सुरूच ठेवत मुखदर्शनाची मागणी लावुन धरली. तथापि खोडाई देवी मंदिराच्या गेटवर भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाने मान्य केली. प्रशासनाने लागलीच मंदिरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या यशवंत विद्यालयाजवळील बॅरिकेटिंग गेटजवळच एक मोठा एलईडी लावून मंदिरातील खोडाई देवीच्या दर्शनाची थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे उपोषण कर्त्यांना लिंबू पानी देऊन उपोषण सोडण्यात आले. तसेच सायंकाळी एलईडी बसविल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी मागणीला यश आल्याने खोडाई देवी व वाघेश्वरी देवीच्या नामाचा जयघोष करण्यात आला.
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार