सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिलांनी विविध क्षेत्रात अग्रेसर राहून नाव लौकिक मिळवावे :- सौ.प्रणिताताई देवरे

सौ.प्रणिताताई देवरे

Sudarshan MH
  • Nov 3 2020 6:46PM
अर्धापूर दि.3(अरविंद जाधव)महिलांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात समर्पण भावनेने कार्य करावे त्या साठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करून नाव लौकिक करावे असे आवाहन आधुनिक नवदुर्गा सन्मान सोहळा व करोना योद्धा  सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून बोलतांना सौ.प्रणिताताई देवरे यांनी व्यक्त केले. 



अर्धापूर तालुका भाजपा महिला मोर्चा वतिने आधुनिक नवदुर्गा सन्मान  व कोरोना योद्धा सत्कार करण्यात आला. करोना संकटात विविध क्षेत्रात जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा करणाऱ्या  डॉक्टर,नर्सेस,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, पत्रकार,कोरोना लोकडॉऊन मध्ये जनतेला मदत करणारे समाजसेवक यांचा सत्कार करण्यात आला..या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे - चिखलीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नेते धर्मराज देशमुख,भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.चित्रलेखा गोरे,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख,भाजपा युवती जिल्हाध्यक्षा  प्रियंका खांडेकर,अर्चना बरगळ,स्वाती दिदी,जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मण इंगोले,माजी सभापती बाबुराव हेंद्रे,तालुका आरोग्यधिकारी विद्या झिने,डॉ.बाळासाहेब बंडेवार,तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,शहराध्यक्ष विलास साबळे,सचिन कल्याणकर,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा इंगोले,युवा नेते विराज देशमुख,सुधाकर कदम,सौ.मेघा स्वामी आदी मान्यवर उपस्थितीत होते.

    या वेळी प्रमुख पाहुनांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन तसेच दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार  भाजपा युवा मोर्चा व महिला मोर्चाच्या वतिने करण्यात आला. 

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रणिताताई देवरे - चिखलीकर म्हणाल्या की कोरोना च्या लाॅकडाऊन व संचार बंदी मध्यील काळात भाजपाचे कार्यकर्ते जमेलतिथे मदत किट,भाजीपाला वाटप,कमूणेटी किचन,द्वारे गरजूना मदत करीत होते ते  समर्पण भावनेतून काम करून अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा देत होते.



तसेच भविष्यात महिलांनी शैक्षणिक-राजकीय-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून कार्यकरून नाव लौकिक मिळवण्यासाठी पूढे यावे व कर्तृत्व सिद्ध करून नवदुर्गा व्हावे असे आवाहन सौ.प्रणिताताई यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात सौ.चित्रलेखा गोरे,विद्या जिने,अँड किशोर देशमुख यांची समोचित भाषणे झाली.

अधुनिक नवदुर्गा सन्मान व कोरोना योध्या म्हणून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.वर्षाताई संदिप बंडाळे,शहराध्यक्षा सौ.विजयमाला लांडगे,सौ.शिवनंदा टोम्पे,सौ.अंजली शिरसाट यांनी पुढाकार घेतला.

 यावेळी ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष आनंदराव सोळंके, बाबुराव लंगडे,योगेश हळदे,सरचिटणीस उध्दव कदम,अवधूत कदम, अँड.बालाजी कदम,डॉ.संजय सोनटक्के, जगन कल्याणकर,आकाश देशमुख,शिवराम राजेगोरे,नगरसेवक शिवराज जाधव,तुकाराम साखरे,अंबादास आंबेगाकर,अनिल बाचेवार, बालाजी कानोडे,संजय डुबे,विजय साबळे, तुकाराम माटे,संदिप धांडे,आनंद वैद्ये,ज्ञानेश्वर नवले,जटन मुळे,संतोष पवार,राजू अबादार,हिरामण वाघमारे,गोविंद माटे,परमेश्वर लालमे संतोष देशमुख,वैभव काळे,वैभव माटे यांच्या सहअनेक जन उपस्थितीत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.सदस्य रामराव भालेराव तर सुत्रसंचलन सचिन कल्याणकर व आभार विराज देशमुख यांनी मानले. या वेळी नवनिर्वाचित भाजप  पदाधिकारांच्या सत्कार सौ.प्रणिताताई देवरे यांच्या हस्ते करण्यात आला. या काळात  डाॅक्टर,नर्सेस,मेडिकल चालक,अंगणवाडी सेविका,मदतनीस,पेपर विक्रेते,मोफत फळ - भाजी पाला देऊन मदत करणारांच्या कोरोना योध्या म्हणून गौरव करण्यात आला तसेच महिलांना अधुनिक नवदुर्गा म्हणून सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार