रामाराव महाराजांना अन्नदान करून श्रद्धांजली.......
गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू तपस्वी संत डॉ. रामराव महाराज
हदगाव दि.3(अरविंद जाधव):- गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू तपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांना गोर सेना गोर , शिकवाडी व समस्त गोर बंजारा समाजाच्या वतीने अन्नदान करुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
संत रामराव महाराज हे सर्व गोर बंजारा समाजाचे दैवत होते व पोहरागड या ठिकाणी मठाधिपती म्हणून ते सेवा करत होते. महाराजांनि प्रोबोधनच्या माध्यमातून जनजागृतीचे अविरतपणे कार्य करत बंजारा समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. काही दिवसांपासून त्यांची प्रकुर्ती ठीक नसल्याने मुंबई येथे उपचारासाठी नेले असता दि.30 ऑक्टोबर रोजी निधन झाले. निधन झाल्याची वार्ता वाऱ्याच्या झपाट्याने पसरली असता संपूर्ण गोरबंजारा समाज अंतीम दर्शनासाठी पोहरागड येथे आली. येणाऱ्या लोकांची चहा व नास्ता देऊन रामराव महाराज यांना श्रद्धांजली देण्याचे काम हदगाव येथिल गोर सेना, गोर शिकवाडी या सामाजिक संघटनांच्या वतीने उमरखेड रोड येथे करण्यात आली. प्रत्येक गाडीला थांबवून त्यांना अन्न दान केल्या बद्दल येणाऱ्या लोकांनि आभार व्यक्त करून रामराव महाराजांना खरी श्रद्धांजली दिली अशी भावना व्यक्त केली....
या वेळी सेवादार म्हणून रवि चव्हाण, प्रदीप जाधव, विनोद राठोड, बालाजी पवार, बालाजी राठोड, संजय चव्हाण,संजय राठोड,बाळू आडे, अरविंद राठोड, अश्विन राठोड,गणेश राठोड, गणेश जाधव, सुदाम जाधव, नारायण राठोड, दिनेश राठोड,सतीश चव्हाण,पंडित राठोड, लक्ष्मण चव्हाण, मारोती महाराज पिंटू जाधव,रवि राठोड, राजू चव्हाण, गोविंद राठोड, सुरेश आडे, अजय चव्हाण व हदगाव तालुक्यातील बहुसंख्य गोर सैनिक व गोर बंजारा समाजातील लोक उपस्थित होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प