सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
जळगाव :-येथील तहसीलदार वैशाली हिंगे यांची नंदुरबार येथे सरदार सरोवर प्रकल्पाच्या उपसचिव पदी बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज पारित झाले आहेत.जळगावच्या वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या तहसीलदार वैशाली हिंगे यांना आदेश प्राप्त होताच पदस्थानतेच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेशात नमूद केलेले आहे.हिंगे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली असून माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक कुमार गुप्ता यांनी हिंगे यांच्या विरोधात अनेक प्रकरणांमध्ये गैरव्यवहाराबाबतीत पाठपुरावा केला होता.तर हिंगे यांनी गुप्ता यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवला होता.मात्र अखेर आता हिंगे यांची बदली झाली आहे.