सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिल्ह्यातील 1419 गावांची सुधारीत पैसेवारी पुनः पंचनामे करून व झालेल्या चुकीची चौकशी करून परत एकदा जाहीर करण्यात यावी

शेतकरी पुत्रांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर..

Sudarshan MH
  • Nov 7 2020 5:40PM
योगेश शर्मा
बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील 1419 गावांची सुधारीत पैसेवारी पुनः पंचनामे करून व झालेल्या चुकीची चौकशी करून परत एकदा जाहीर करण्यात यावी यासाठी शेतकरी पुत्रांकडून जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यंदाच्या पावसाळ्यात परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.सदर प्रकरणामध्ये सन. 2020-2021 वर्षीच्या खरीप हंगामातील बलडाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यापैकी फक्त 3 च तालुक्यामध्ये "ढगफुटी" झाली का ? उर्वरित 10 तालुक्यांवर अन्याय का ? सुधारीत पैसेवारी मध्ये झालेला घोळ अंतिम पैसेवारी मध्येही झाला तर शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित राहिल.
बुलढाणा जिल्ह्यातील एकुन 1419 गावांपैकि फक्त 366 गावांचीच सुधारीत पैसेवारी कमी दाखवण्यात आली व हे सर्व गावे 3च तालुक्यातील आहे जे तालुके आपले खासदार साहेब व पालकमंत्री साहेब यांचे मतदारसंघ आहेत. उर्वरित तालुके यातुन वगळण्यात आले आहे. पावसामुळे सवत्र नुकसान झालेले आहे शेतकरी संकटात सापडलेला आहे. बुलडाणा जिल्हा मागासलेला आहे त्यात कोरोना सारख्या महामारीमुळे सर्वकाही ठप्प झालेलं आहे , शेतकऱ्याला शेतीमध्ये चांगल उत्पन्नही होत नाही.शेतमालाला चांगला हमी भाव नाही, त्यात सावकाराच्या कर्जाचा विळखा.अशा संकटाच्या काळात प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तलाठी व अधिकारी  यांच्यार्फत पुनः पंचनामे करून व जाहिर केलल्या चुकीच्या पैसेवारीची सखोल चौकशी करून  
परत जाहीर करावी व अंतिम पैसेवारी मध्ये या प्रकारचा कसलाही घोळ होणार नाही यांची दक्षता घ्यावी.व शेतकर्याला त्याचा हक्क मिळवून द्यावा. नाही शेतकर्यांच्या आक्रोशाला सामोरे जाल अशी चेतावणी देण्यात आली.यावेळी चैतन्य जोशी,कैवल्य कुलकर्णी ,मकरंद जोशी ,स्वप्निल कुलकर्णी ,राहुल नागपूरे ,अभिजीत हुडेकर ,कौशल रींढे,कपिल झगडे
आदी मान्यवर उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार