सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

१ नोव्हेंबर मंदिरे उघडा अन्यथा टाळे तोडू - भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा इशारा

भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचा इशारा

Sudarshan MH
  • Oct 28 2020 6:42PM
मुम्बई - राज्यातील मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे १ नोव्हेंबर पर्यंत उघडली नाही तर नाईलाजाने टाळे तोडावे लागेल, असा इशारा भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष  आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे. आघाडीच्या शिष्टमंडळाने बुधवार 28 ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
मंदिरे उघडण्याच्या मागणीकरिता दोन मोठी आंदोलने करुन सुद्धा कोणताही निर्णय न घेतल्याने आध्यात्मिक समन्वय आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन वेळा पत्रे पाठवून साधु-संतांच्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ मागितली होती आणि दि. २७ ऑक्टोबर पर्यंत मंदिरे उघडण्याची मागणी केली होती.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीची वेळही दिली नाही तसेच मंदिरे उघडण्याचा निर्णय देखील घेतला नाही. यामुळे 
बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२० रोजी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी चे प्रदेशाध्यक्ष 
आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात विविध पंथ व संप्रदायांच्या प्रमुख साधु-संतांचे शिष्टमंडळ महामहिम राज्यपाल महोदयांना आज भेटले. 
या शिष्टमंडळात पुढील संत महंत होते.
1) आचार्य तुषार भोसले, प्रदेश संयोजक, आध्यात्मिक समन्वय आघाडी 
2) संजयनाना महाराज धोंडगे
विश्वस्त , श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर 
3) भाऊ महाराज फुरसुंगीकर , केंद्रीय  धर्मसभा अध्यक्ष ,अ.भा. वारकरी मंडळ 
4) सुदर्शन महाराज कपाटे महानुभाव  , अध्यक्ष,  ग्लोबल महानुभाव संघ
5) आचार्य जिनेंद्र जैन , समन्वयक  जैन स्वाध्याय विभाग 
6) सुरेंदरसिंग सुरी, शीख पंथ प्रतिनिधी 
7) केशवचंद्र दास : ISKCON प्रतिनिधी 
8) भदन्त शांतिरत्न, अध्यक्ष, मुंबई भिक्कु संघ 
9) नितीनभाऊ मोरे, अध्यक्ष, बौद्ध उपासक उपासिका महासंघ
10) श्रीमहंत गिरीजानंद सरस्वती, कोषाध्यक्ष,  अ.भा. आखाडा परिषद

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार