सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एकतरफी प्रेमातून गळा चिरणाऱ्याला फाशी द्या; मागणी करीत संघटनांनी पुकारला शहादा बंद

मागणी करीत संघटनांनी पुकारला शहादा बंद

Nandurbar MH
  • Oct 24 2020 6:48PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार -  एक तर्फी प्रेमातून अवघ्या 10 वीतील विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या केल्याची घटना शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. परंतु अवघ्या 6 तासात शहादा पोलिसांनी वेगाने तपास करून ही घटना उघडकीस आणली. दरम्यान आदिवासी संघटना आक्रमक बनल्या असून त्यांनी 26 रोजी शहादा बंदची हाक दिली आहे. 
एक मोठा जमाव मोर्चाच्या स्वरूपात सारंगखेडा पोलीस ठाण्यावर चालून आला होता. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशाा घोषणा देण्यात आल्या. सर्व आदिवासी संघटनांनी पोलिसांना एकत्रित निवेदन सादर केले तसेच हत्येच्या निषेधार्थ दिनांक 26 ऑक्टोबर रोजी शहादा बंद ठेवण्याचे संघटनांतर्फे आवाहन करण्यात आले. 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील  शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे भूतबंगला परिसरात राहणारे संतोष ब्रिजलाल सोनवणे यांची मुलगी 22 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेपासून बेपत्ता झाली होती. म्हणून सकाळी ऊठून आठ वाजता म्हणजे  23 ऑक्टोबर रोजी त्यांनी सारंगखेडा पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदवली. सारंगखेडा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब तपास सुरू केला. रात्री घरातून निघालेली मुलगी स्वतः गेली की कोणी नेले यावर तपास चालू असताना जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रभारी किशोर नवले शहादा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश उपविभागीय पोलिस अधिकारी साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मुलगी नेहमी घराबाहेर खाटेवर झोपते असे तिच्या पालकांनी सांगितले होते. त्याजागी त्यांना काही रक्ताचे डाग आढळून आले. तो धागा पकडून अधिक तपास केल्यावर तिच्या घरासमोर  राहणारा वीस वर्षे वयाचा किशोर वडार याच्यावर त्यांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता लगेचच त्याने गुन्हा कबूल केला. किशोर याने कबूल केले की त्या मुलीशी प्रेम संबंध होते व तो लग्नाचा आग्रह धरू लागला होता. परंतु तिच्या घरातून या संबंधांना मान्यता नव्हती. घरातून प्रेम संबंधांना विरोध आहे म्हणूनच त्या मुलीने अबोला धरला होता. याचा राग मनात ठेवून 22 ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजता किशोर याने तिला घराबाहेर बोलावले माझ्याशी लग्न का करत नाही? यावर बोलणे केले. परंतु तिचा विरोध कायम असल्याचे पाहून त्याने अत्यंत निर्दयपणे तिच्या गळ्यावर चाकूचे वार केले आणि कोणाला कळू नये म्हणून गोणपाटात मृतदेह बांधून तिथून दीड किलोमीटर अंतरावरील एका शेतात लपवून ठेवला. परंतु लगेचच पोलिसांच्या तावडीत सापडल्यामुळे किशोरचे निर्दयी कृत्य उघड झाले. त्याच्याविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार