सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची परवानगी - खा. डॉ. हिना गावित

महाविद्यालय सुरु करण्याची परवानगी - खा. डॉ. हिना गावित

Sudarshan MH
  • Oct 28 2020 7:17PM
नंदुरबार: गेल्या दहा वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येते होते.अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाल सुरू करण्यास परवानगी मिळाली असून या वर्षापासून प्रवेश प्रक्रीया राबविण्याबाबतचे पत्र एनएमसीकडून नुकतेच प्राप्त झाले असल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आ.डॉ.विजयकुमार गावित,प्रभारी डिन शुक्रे उपस्थित होते.वैद्यकीय महाविद्यालयाबाबत माहिती देत असतांना सुरूवातीला आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी सांगितले की,सन २००९-१० च्या सुमारास नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालयास मंत्रीमंडळाची मंजूरी मिळाली होती.त्यानंतर दि.२१ जानेवारी २०१२ रोजी रायगड,सातारा,नंदुरबार व मुंबई परिसरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मिळाली.मात्र त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास अनेक अडचणी येत गेल्या व वैद्यकीय महाविद्यालय सुरू होवू शकले नाही.नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असल्याने खा.डॉ.हीना गावित यांनी सतत पाठपुरावा केल्याने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मिळाल्याचे आ.डॉग़ावित म्हणाले.यानंतर खा.डॉ.हीना गावित यांनी सांगितले की,सन २०१४पासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू होते.

नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सुरूवातीला हस्तांतरीत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले.त्यानंतर सुरूवातीला एमसीआय तपासणीसाठी आल्यावर त्यांनी ८ त्रुटी काढल्या होत्या.सदर त्रुटींची पूर्तता करण्यात प्रभारी डीन शुक्रे यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे खा.डॉ.हीना गावित म्हणाल्या.यांनतर एनएमसीने तीन दिवस तपासणी केल्यानंतर नुकतेच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचे पत्र मिळाले असून यावर्षापासून प्रवेशप्रक्रीया राबविण्यास सुरूवात करण्यात येईल असे खा.डॉग़ावित यांनी सांगितले. यासाठी केंद्र सरकारकडून १९५ कोटी रूपये इतका ६० टक्क्यांचा निधी मार्च महिन्यात मंजूर करण्यात आला तर उर्वरित ४० टक्के १३० कोटी रूपयांचा निधी राज्य शासनाकडून लवकरच मिळणार असल्याचे खा.डॉ.हीना गावित म्हणाल्या. नीट उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार या वर्षापासून नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहेत.आगामी काळात नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या सुटण्यास यामुळे मदत होणार असल्याचा विश्वास खा.डॉ.हीना गावित यांनी व्यक्त के

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार