सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार : कायार्लयीन व्हाट्सअँप ग्रुपवर सरकारी अधिकाऱ्याने टाकली अश्र्लील क्लिप

सरकारी अधिकाऱ्याने टाकली अश्र्लील क्लिप

Nandurbar MH
  • Oct 29 2020 12:42PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

  नंदुरबार :-  शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी असलेल्या व्हाट्सॲप ग्रुप वरून अश्लील चित्रफित व्हायरल केल्या प्रकरणी येथील आदिवासी विकास प्रकल्प विभागातील एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नंदुरबार येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कामकाजाच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकार्‍यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सहभाग असलेला व्हाट्सॲप ग्रुप बनवलेला आहे. या व्हाट्सॲप ग्रुपवर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक नियोजन अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने पावणे दोन मिनिटांची अश्लिल चित्रफित व्हायरल केली. हा प्रकार सोमवारी रात्री ग्रुप वरील सदस्यांना लक्षात आला.

धक्कादायक बाब अशी की, उपजिल्हाधिकारी तथा आयएएस अधिकारी वनामती सी यांच्यासह क्लासवनच्या सहा महिला अधिकारी ग्रुप सदस्य असल्याने त्या सर्व महिला अधिकाऱ्यांचा या प्रकारामुळे अवमान झाला. पुरुष सदस्यांसह एकूण 53 सदस्य या ग्रुपवर आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब वसावे यांनी शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी याबाबतची फिर्याद दिली. महिला अधिकाऱ्यांना लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी तसेच समाज माध्यम विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत तपास अधिकारी पोलिस निरीक्षक कळमकर यांनी आरोपीला अटक केली.

काल (बुधवार) न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कस्टडी सुनावून लगेच जामिनावर मुक्तता केली. राहुल इधे असे आरोपीचे नाव असून, रात्री नशेत अनावधानाने कृत्य घडल्याचे तपासात आढळले, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार