सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाविकास आघाडी कार्यकाळात मुख्य अभियंता पदभरती घोटाळाउर्जामंत्र्यांचे निवड समिती व मुख्य अभियंत्याला अभय

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे लक्ष घालणार का

Sudarshan MH
  • Oct 29 2020 10:12PM

*खापरखेडा-प्रतिनिधी*
राज्यात महाविकास आघाडी कार्यकाळात महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता पद भरती घोटाळा उघडकीस आला मुख्य अभियंता पदावर नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली मात्र कार्यवाही करण्यात आली नाही उलट नियमबाह्य निवड करण्यात आलेल्या मुख्य अभियंता व निवड समितीला पाठीशी घालण्यात येत असून ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांचे अभय असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामूळे मुख्य अभियंता पद भरती घोटाळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लक्ष घालणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती "२०१७" प्रक्रिया २२ में २०१७ रोजी राबविण्यात आली मात्र निवड समितीने पात्र उमेदवारांना डावलून खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंत्याची नियमबाह्य १० गुण वाढवून मुख्य अभियंता पदावर निवड केली सदर घोटाळा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला शिवाय माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे यासंदर्भात चौकाशी समिती स्थापन करण्यात आली मात्र मागील दोन महिन्यांपासून कार्यवाही थंडबसत्यात पडली आहे.अजूनही चौकाशी समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही त्यामूळे शंकेला पेव फुटले आहे.
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे या देशात न्यायव्यवस्था आहे त्यामूळे दोषींवर कार्यवाही करने अपेक्षित आहे मात्र ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या आशिर्वादाने त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे खापरखेडा औष्णिक वीज केंद्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या गृह जिल्ह्यात आहे महानिर्मिती कंपनी अंतर्गत झालेला मुख्य अभियंता पद भरती घोटाळा डॉ नितीन राऊत यांच्या मंत्रालया अखत्यारित विषय आहे त्यामूळे त्यांना घोटाळ्याची परिपूर्ण माहिती आहे मुख्य अभियंता पद भरती प्रक्रियेत मुख्य अभियंत्यांची निवड करतांना चूक झाली असल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे त्यामुळे ती दुरुस्ती करण्याच्या हालचालीला वेग आला आहे यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे मात्र नियमबाह्य मुख्य अभियंता पदावर निवड झालेल्या मुख्य अभियंत्यांच्या संदर्भात निर्णय राखून ठेवल्याची 
माहिती सूत्रांनी दिली आहे वास्तविक पाहता नियमबाह्य निवड झालेल्या मुख्य अभियंत्याला कायद्याने रिव्हर्ट करने अपेक्षित आहे त्यांच्या जागेवर पात्र उमेदवाराला पदोन्नती देने न्यायसंगत आहे मात्र आजही तथाकथित मुख्य अभियंता खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत आहे त्यामूळे मात्र कुठं तरी पाणी मुरत असल्याचं दिसून येत आहे.
जवळपास वर्षभरा पूर्वी शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली राज्यात शिवसेना, कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले एकेकाळी विरोधी बाकावर बसणारे त्रिकुट सत्तेवर आले राज्याची धुरा स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांभाळत आहे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मुख्य अभियंता पद भरती घोटाळा उघड झाल्यामुळे महाविकास आघाडीला गालबोट लागले आहे त्यामूळे सर्व सामान्य वर्गात नाराजीचा सूर आहे.
 २०१७ मध्ये महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता पद भरती घोटाळा हा भाजपच्या कार्यकाळात झाला जवळपास दोन अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात उघडकीस आला त्यामूळे दोषींवर कार्यवाही करण्याची संधी महाविकास आघाडी कडे आयती चालून आली मात्र संधीच सोन करता आलं नाही उलट निवडबाह्य निवड झालेल्या मुख्य अभियंता व दोषी निवड समितीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्यामूळे सदर प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालावं अशी मागणी परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार