सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माणुसकीची भिंत तर्फे नीट परीक्षेत सर्वसामान्य परिस्थितीत उत्कृष्ट गुण प्राप्त केल्या बद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार*

सर्वसामान्य परिस्थितीत उत्कृष्ट गुण प्राप्त केल्या बद्दल

Sudarshan MH
  • Oct 29 2020 9:40PM

*प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001* माणुसकीची भिंत पुसद चे सदस्य हे मागील चार वर्षापासून गोरगरीब गरजू जनतेसाठी कपडे जेवण निवारा या साठी प्रयत्न करत आहे सर्व सामान्य जनते ला मदत करण्याचा प्रयत्न दिवस-रात्र माणुसकीच्या भिंतीचे सदस्य  करत आहे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत आहेत
गरीब परिस्थितीत नीट बारावी दहावी वर्गात चांगले गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी करून इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता
त्यांच्या घरी जाऊन त्यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह पेढा देऊन त्यांचा  व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करत असतात यावर्षी नीट च्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त झाले अशा विद्यार्थ्यां चा सत्कार करण्यात आला व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा साठी शुभेच्छा देण्यात आल्या यावर्षी नीट परीक्षेमध्ये 
अमृता सुशांत महल्ले  हिने720 पैकी 595 गुण प्राप्त केले तिला मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे वडील मेडिकल चालवतात
सोहेल मुश्ताक खान यांने574 मिळविले याचे वडील पोलीस खात्यामध्ये काम करतात
कु़ वैशू राजसिंग राठोड हिने 573मिळविले
व पंकज पाल महाराज यांची लहान बहीण तिचे आई वडील शेती करतात पंकज पाल महाराज यांच्या  मार्गदर्शना मुळे तिने हे यश प्राप्त केले
नमिरा मेमन इक्बाल शेख हिने 539 गुण मिळवून घवघवीत  यश प्राप्त केले तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे तिचे वडील छोटा व्यवसाय करतात या यशाचे श्रेय ती आई-वडिलांना व शिक्षकांना देते  या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांनी व माणुसकीच्या भिंतीच्या सदस्यांनी पुढील शिक्षणाच्या  वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या आई-वडिलांना खूप खूप आनंद झाला
विद्यार्थ्यांनी व त्यांच्या आईवडिलांनी मान्यवरांचे आणि माणुसकीच्या भिंतीच्या सदस्यांचे खूप खूप आभार मानले

या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी सत्यपाल महाराजांचे शिष्य पंकज पाल महाराज, शेख नईम शेख मुनाफ सर जिल्हा अध्यक्ष जमाती इस्लामी यवतमाळ,इर्शाद सर प्राचार्य उर्दू हाय स्कूल व जुनिअर कॉलेज पुसद,श्री गिरीशभाऊ अनंतवार प्रभाकर ठाकरे,करण ढेकळे सुरज भाऊ अनंतवार साहेबराव जाधव व माणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन दत्तात्रेय जाधव उपाध्यक्ष  मधुकर भुजंगराव वाळूकर  सचिव जगतबहादुर कीर्तीसिंह रावल सदस्य संतोष भगवानराव गावंडे दीपक घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार