पदोन्नती मिळूनही मुंबई बाहेर बदलीने हवालदिल झाले अंमलदार
पदोन्नती मिळूनही मुंबई बाहेर बदलीने 177 अंमलदार हवालदिल झाले असून
पदोन्नती मिळूनही मुंबई बाहेर बदलीने 177 अंमलदार हवालदिल झाले असून आता या नाराजीची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी थेट पोलिस महासंचालक यांस पत्र पाठवून ज्यास उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे अश्या मुंबईतील अंमलदारांना मुंबईतच रुजू करण्याची विनंती केली आहे.
अहर्ता परीक्षा 2013 उत्तीर्ण झालेल्या 1061 पोलीस अंमलदार आणि सहाय्यक उपनिरीक्षक यांना पोलीस महासंचालक कार्यालयाने पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती दिली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पाठपुरावा केला होता. पदोन्नती देण्यापूर्वी प्रत्येक पोलिस अंमलदाराकडून बदलीसाठी महसूल संवर्ग मागविले होते त्याप्रमाणे मुंबईतील सर्व पदोन्नतीधारकांनी कोकण -२ संवर्ग दिला होता या संवर्गात मुंबई पोलीस आयुक्तालयाचा समावेश होतो.
मुंबई पोलीस आयुक्तालय यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची अंदाजे 2300 पदे रिक्त असतानासुद्धा मुंबई पोलीस दलातील 177 पोलिस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देऊन नागपूर शहर,औरंगाबाद शहर, नागपूर शहर, औरंगाबाद रेल्वे आणि ठाणे परिक्षेत्र याठिकाणी बदल्या केल्या आहेत यामध्ये अनेक पोलीस अंमलदार हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असून केवळ चार ते पाच वर्ष सेवानिवृत्तीची बाकी आहेत. अनेक पदोन्नती मिळालेले अंमलदार हे मधुमेह, ब्लड प्रेशर आणि इतर जर्जर आजाराने ग्रसित आहेत. त्यामुळे त्यांच्या केलेल्या बदल्या अन्यायकारक असल्याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त मुंबई परमवीर सिंग यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून मुंबईबाहेर दर्शविलेल्या बदल्या रद्द होण्यासाठी विनंती केली आहे.
पदोन्नती मिळालेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी पसंती दिलेल्या महसूल संवर्गात रिक्त पदे असतानासुद्धा मुंबईबाहेर बदली दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अनिल गलगली यांच्या मते आधीच रखडलेल्या पदोन्नती आणि आता मुंबईबाहेर झालेल्या बदलीमुळे नव्याने उपनिरीक्षक बनलेल्या अंमलदार आणि सहाय्यक उपनिरीक्षक यांस न्याय देण्यासाठी महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.
,
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प