सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अल्पवयीन मुलीचा खुन करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या : नंदुरबार जिल्हा कमिटी व एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य

नंदुरबार जिल्हा कमिटी व एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य

Sudarshan MH
  • Oct 27 2020 4:25PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

सारंगखेडा ता.शहादा जि.नंदुरबार येथे अल्पवयीन मुलीचा खुन करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या : नंदुरबार जिल्हा कमिटी व एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य 
नंदुरबार जिल्हा कमिटी व एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य याच्या तर्फे निवेदन उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांना देताना संघटनेचे पदाधिकारी  


मौजे सारंगखेडा ता.शहादा जि.नंदुरबार येथे दि.२३/१०/२०२० रोजी पहाटे झालेल्या भुतबंगला परिसरातील वस्तीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करुन तिचा झोपेत असतांना खुन करणारा नराधम किशोर शिवदास वडर, रा.सारंगखेडा यास कठोर फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरुन यानंतर कोणीही आदिवासी समाजासह कोणत्याही समाजाच्या मुलींवर किंवा स्त्रियांवर अशाप्रकारचे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही.

नुकत्याच रावेर तालुक्यातील भिल आदिवासी समाजाचे अल्पवयीन एकाच कुटुंबातील बालकांचा खुन झाला त्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत लगेच खान्देशातील दुसरी घटना घडली आहे.  अशा नराधमास जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे जेणेकरुन भविष्यात आदिवासी समाजासह इतर समाजच्या मुलींवर वा स्त्रियांवर अत्याचार करण्याच कोणी धाडस करणार नाही.तरी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेता किशोर शिवदास बडर याच्याविरुद्ध ८ दिवसाच्या आत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर शासन होवुन फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र भरात आंदोलन करेल व होणाऱ्या विपरीत परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे आवाहन नंदुरबार जिल्हा कमिटी व एकलव्य संघटना, महाराष्ट्र राज्य  यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

यावेळी  नाना मनोजभाऊ सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष -  सनिलभाऊ ठाकरे, टायगर फोर्स जिल्हाध्यक्ष - भगवानभाऊ भिल, कोपर्ली गट अध्यक्ष कृष्णाभाऊ भिल, तालुकाध्यक्ष -  रविंद्र भिल, उपतालुकाध्यक्ष-विशाल प्रकाश मगरे, शहराध्यक्ष नगरकिरण भवन ठाकरे, होळ तर्फे रनाळे शाखाध्यक्ष - पिंटू सिताराम भिल, शनिमांडळ अध्यक्ष आदी उपथित असून निवेदनात त्यांचा सह्यांचे आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार