सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे जिल्ह्याततील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपा द्वारा एक हात मदतीचा

भाजपा द्वारा एक हात मदतीचा

Sudarshan MH
  • Oct 28 2020 7:54AM
 
प्रतिनिधि: दिपक चव्हाण पुणे 
 
 
महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे पुणे जिल्हातील शिरूर,आंबेगाव, खेड,जुन्नर,दौड,इंदापूर ह्या भागांमध्येही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आसुन या नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एकात्मतेचा असा अनोखा उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवला जात आहे
 
भारतीय जनता पार्टी चे नेते
राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार गिरीश बापट,माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या सुचनेनुसार एक हात मदतीचा हा उपक्रम राबवल्या जात असून भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी चे पुणे जिल्हा अध्यक्ष जयेश शिंदे यांनी आज शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे जाऊन नुकसानग्रस्त रहिवाशांच्या व्यथा समजून नुकसानग्रस्त गोरगरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करत ब्लॅंकेट चटई यांची मदत केली असून उद्योगजक विनोद माखिजा यांच्या मातोश्री शालिनी माखिजा यांचे हि या कामी सहकार्य लाभले असून राज्य सरकारने या नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी आणि पावसामुळे झालेल्या घरांच्या पडझडीमुळे उभारी देण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा,असे आवाहन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांच्या वतीने करण्या आले
 
या वेळी युवा मोर्चा अध्यक्ष श्री रोहितजी खैरे, विद्यार्थी आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष सुरज चव्हाण, श्री. संदिप होन, भाजपचे केशव पाचर्णे, वैभवजी गवारे,हर्षवर्धन दोरगे, हरून इनामदार, विजय लोखंडे, स्वप्नील राऊत, अक्षय ढमढेरे, विशाल लोखंडे, पंकज गवारे, राहुल गायकवाड यांच्या सह नुकसानग्रस्त रहिवाशी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार