सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बुलडाणा येथील 3 युवकांनी केली नवी मुंबईत "रॉबरी" ,,,विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकुने हल्ला करुण गळा चीरला

शहर पोलिसाचे डीबी स्कॉडने तिन्ही आरोपिंना घेतले ताब्यात

Sudarshan MH
  • Oct 31 2020 11:26AM
(योगेश शर्मा)
बुलडाणा -  बुलढाणा येथील तीन युवक शॉपिंगसाठी मुंबईला गेले असता त्यांच्याजवळील पैशे संपले म्हणून त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबून एका विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार करून त्याचा गळा चिरला व त्याच्या जवळील मोबाईल व नगदी 8 हजार रुपये घेऊन पसार झाले.अधिकारीच्या मोबाईल लोकेशन वरून तिन्ही आरोपीना बुलडाणा शहर पोलिसच्या डीबी पथकाने ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलिसच्या स्वाधीन केले आहे.
    याबाबत पोलिसाने दिलेली माहिती अशी की बुलडाणा येथील अमित सुनील बेंडवाल 18 वर्ष,आबिद खान अयुब खान उर्फ ऑल 18 वर्ष व अदनान कुरेशी वहीद कुरेशी उर्फ बब्या 19 वर्ष हे तिघे शॉपिंग साठी मुंबईला गेले होते. या पैकी एका जवळचा पाकीट हरवला.पैशे नसल्याने त्यांनी 22 ओक्टोबर रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास सीबीडी सर्कल जॉगिंग ट्रैक जवळ,बेलापुर नवी मुंबई येथे रासत्याने पायी जात असलेले 39 वर्षीय विक्रीकर अधिकारी महेश मधुकर बिनवडे यांच्यावर अचानकपणे चाकुने वार करुण त्यांना जख्मी केले व त्यांचा जवळचा एंड्रॉइड मोबाइल व पाकिट मधील नगदी 8 हजार रुपये घेऊन फरार झाले.या हल्ल्यात महेश बिनवडे यांचा गळा चीरला व ते गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपचारार्थ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.या प्रकरणी अज्ञात आरोपीं विरुद्ध सीबीडी बेलापुर पोलीस ठाण्यात भादवीची धारा 394 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला.जख्मी बिनवडे यांच्या मोबाइलचा लोकेशन घेतला असता तो मुंबई येथे दिसला,त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर बुलडाणा येथील आरोपींनी गुन्हा केल्याचे समोर आले.याची माहिती बुलडाणा शहर ठानेदार प्रदीप सालुंखे यांना देण्यात आली.शहर डीबी स्कॉडचे शिवाजी मोरे,दत्ता नागरे व संदीप कायंदे यांनी बुलडाणा येथील आरोपी अमित बेंडवाल, आबिद खान व अदनान कुरेशी या तिघांना ताब्यात घेतले.आज 29 ओक्टोबर रोजी बेलापूर पोलीस बुलडाणा शहरात दाखल झाली असून तिन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या रॉबरीत मुम्बई येथील इतर 2 आरोपिंचा समावेश असल्याची माहिती शहर ठाणेदार प्रदीप सालुंखे यांनी असून आरोपी अमित बेंडवाल वर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे ही ते म्हणाले.आरोपींना घेण्यासाठी नवी मुंबई येथील पीएसआई एन. डी.शिंदे,पीएसआई एन. पी.सांगळे,संदीप फड,विनोद देशमुख व अज़हर शेख बुलडाणा आलेले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार