सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या कुलकर्णी बंधूंचा श्री महादेवजी जानकर यांच्या हस्ते सत्कार

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती प्राप्त करणार्‍या श्रीनिवास कुलकर्णी व वरूण कुलकर्णी या भावंडांचा माजी मंत्री आ.महादेव जानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

s.ranjankar
  • Jul 22 2021 2:20PM
 
लातूर/प्रतिनिधी:राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती प्राप्त करणार्‍या श्रीनिवास कुलकर्णी व वरूण कुलकर्णी या भावंडांचा माजी मंत्री आ.महादेव जानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
   राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात एनसीईआरटीच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येते. गतवर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून श्रीनिवास कुलकर्णी व वरुण कुलकर्णी या भावंडांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. दोघांनाही शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
  या यशाबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष,माजीमंत्री आ.महादेवजी जानकर यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन दोन्ही भावंडांचा सत्कार केला.याप्रसंगी शेळी- मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब दोडतले,रासपचे जिल्हाध्यक्ष प्रा.विष्णू गोरे यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख रामराव रोडे,गोविंद नरवटे,अविनाश कोळी,प्रदीप मोरे,राहूल देश्पांडे,दादासाहेब करपे,रासपचे पदाधिकारी आणि व्यंकटेश कुलकर्णी,जगदीश कुलकर्णी व परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार