लसीकरण घोटाळा : हिरानंदानी सोसायटीतील लसीकरण शिबीर बोगस; महापालिकेचं ‘सिरम’ला पत्र
मुंबई: हाऊसिंग सोसायटी, चित्रपट निर्मितीशी संबंधित कंपन्यांपाठोपाठ आता महाविद्यालयातही लसीकरण घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मुंबई: हाऊसिंग सोसायटी, चित्रपट निर्मितीशी संबंधित कंपन्यांपाठोपाठ आता महाविद्यालयातही लसीकरण घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुंबई महापालिकेनंही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणी करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत हिरानंदानी हेरिटेज हाऊसिंग सोसायटीत घेण्यात आलेलं लसीकरण शिबीर बेकायदेशीर असल्याच दिसून आलं आहे. नागरिकांना देण्यात आलेली लस खरी होती का याची पडताळणी करण्यासाठी आता मुंबई महापालिकेनं सिरम इन्स्टिट्यूटला पत्र पाठवलं आहे.
मुंबईत शिबिरं आयोजित करून लस घोटाळा करणाऱ्या टोळीविरोधात नोंद गुन्ह्यांचा मुंबई पोलिसांकडून स्वतंत्रपणे तपास केला जाणार आहे. शनिवारी या टोळीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तर बोरिवलीतील आदित्य महाविद्यालयानेही या टोळीविरोधात लस घोटाळ्याची तक्रार केली. हळूहळू बोगस लसीकरण शिबिरं घेण्यात आल्याचे प्रकार मुंबईत समोर येऊ लागले आहेत. कांदिवली पश्चिममधील हिरानंदानी हेरिटेज हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी झालेला प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर मुंबई पोलिलांबरोबरच महापालिकेनंही यांची चौकशी सुरू केली आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प