सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

80 टक्के क्रूड तेल आयात ही अर्थव्यवस्थेसमोरील मोठी समस्या ना. गडकरी

80 टक्के क्रूड तेल आयात ही अर्थव्यवस्थेसमोरील मोठी समस्या ना. गडकरी ‘रेग्युलेटरी रिक्वायरमेंट फॉर इले. व्हेईकल’ ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम

Snehal Joshi .
  • Dec 9 2020 11:09PM
देशाला सध्याच्या स्थितीत लागणार्‍या इंधनासाठी 80 टक्के क्रूड तेल आयात करावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी आयात ही आपल्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठी समस्या आहे. ही आयात कमी होऊन आत्मनिर्भरतेकडे भारताला घेऊन जाण्याची शासनाची भूमिका आहे. जैविक इंधन हाच यावरील पर्याय असल्याचे केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
‘रेग्युलेटरी रिक्वायरमेंट फॉर इलेक्ट्रिक व्हेईकल’ या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. अण्णासाहेब पाटील, अमित वर्धन, कॅ. रत्नपारखी, हेमंत काबरा, डी. पी. सास्ते, संजय गंजू आदी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. गडकरी म्हणाले- एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रूड तेलाची आयात ही आपल्या देशाला परवडणारी नाही. यामुळे अर्थव्यवस्थेसमोर प्रश्न निर्माण होतात आणि प्रदूषणाच्या समस्येलाही तोंड द्यावे लागते. यामुळे जैविक इंधनाचा वापर हा अत्यंत आवश्यक आहे. आपल्या कृषी क्षेत्राला आता जैविक इंधन निर्मिती क्षेत्राकडे वळावे लागणार आहे. देशात साखर, गहू, मका याचे मुबलक उत्पादन आहे. साखरेच्या निर्यातीवर सहा हजार कोटींचे अनुदान द्यावे लागले. असे असताना या धान्यांपासून आपल्याला आता इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजीची निर्मिती करावी लागणार आहे.
इलेक्ट्रिक वाहने ही आपल्या अर्थव्यवस्थेला परवडणारी असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- इलेक्ट्रिक वाहनांना लागणारे सुटे भाग आपल्याला चीनकडून आयात करावे लागतात. वास्तविक ही स्थिती आता बदलावी लागणार आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांनी सहायक कंपन्या तयार करून हे सुटे भागही देशातच बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे सुट्या भागांची आयात कमी होऊन देश आत्मनिर्भरतेकडे जाईल. सार्वजनिक वाहतूक ही इलेक्ट्रिक इंधन किंवा सीएनजी, बायो सीएनजीवर चालविण्यात यावी. इलेक्ट्रिकवर ट्रॉली बसेस देशाला परवडण्यासारखी आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी हा एक चांगला पर्याय देशासमोर येईल. त्याचप्रमाणे ब्रॉडगेज मेट्रो हा पर्यायही परवडणारा आहे. नागपूरसभोवती 800 किमीच्या ब्रॉडगेज मेट्रो चालविण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठी रेल्वेची आणि महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली आहे. नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाचा फायदा देशाला करून देण्याची हीच वेळ आहे, असेही ते म्हणाले.
जैविक इंधनावर व इलेक्ट्रिकवर चालणार्‍या वाहनांची निर्मिती अधिक झाली तर त्या वाहनांची किंमतही कमी होईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- देशात वीज मुबलक आहे, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आहे. या ऊर्जेचा वापर करून सार्वजनिक व खाजगी वाहतूक सुरु झाली तर एक चांगला पर्याय लोकांनाही उपलब्ध होणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार