सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जैविक इंधनामुळे शेतकरी आणि ग्रामीण क्षेत्र समृध्द होईल : ना. गडकरी

जैविक इंधनामुळे शेतकरी आणि ग्रामीण क्षेत्र समृध्द होईल : ना. गडकरी ‘एक होता कार्व्हर’ पुस्तकाचे प्रकाशन

Snehal Joshi .
  • Dec 1 2020 4:31PM
देशात दरवर्षी अतिरिक्त होणार्‍या गहू, तांदूळ, मका आणि साखर यापासून जैविक इंधन निर्मिती झाली तर शेतकरी आणि ग्रामीण-मागास भाग सुखी, संपन्न व समृध्द होईल. इथेनॉल, मिथेनॉल, सीएजी, बायो सीएनजी, इलेक्ट्रिक हेच इंधन आता देशाचे भविष्य राहणार असून डिझेल पेट्रोलसारखे 100 जैविक इंधन शेतकरी तयार करून देशाला देईल, असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
प्राज इंडस्ट्रीतर्फे व वीणा गवाणकर लिखित ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या प्रकाशन समारंभात ना. गडकरी बोलत होते. इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत वैद्य, डॉ. प्रमोद चौधरी डॉ. सदानंद बोरसे व लेखिका वीणा गवाणकर याप्रसंगी उपस्थित होते. अमेरिकेतील वॉशिंग्टन कार्व्हर यांचे जीवन प्रेरणादायी आहे. कार्व्हर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार आमच्या डॉ. चौधरी यांना मिळाला, याबद्दल त्यांचे अभिनंदन ना. गडकरी यांनी केले. अमेरिकेत ग्रामीण क्षेत्राला दिशा देण्याचे काम कार्व्हर यांनी केले. पण आपल्याकडे नेमकी उलट स्थिती असल्याचे सांगून ना.गडकरी म्हणाले- आधी 80 लोक हे ग्रामीण भागात वास्तव्यास असायचे, पण आता ही संख्या 65 टक्क्यांपर्यंत आली आहे. शहरीकरण अधिक होत आहे. कृषी आणि ग्रामीण क्षेत्र हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे शहरीकरण अधिक होत आहे. शेती किफायतशीर नसल्यामुळे विदर्भात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती अडचणीत आहे. शेतकर्‍यांची अवस्था भयानक आहे. शेतकरी हा कर्जात जन्मला, कर्जातच जगला आणि कर्जात त्याला मरण आले.
कृषी आणि ग्रामीण-मागास भागातील लोक आणि शेतकर्‍यांचे जीवन सुधारणे यासाठी या क्षेत्राच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाची आवश्यकता असल्याचे सांगताना ना.गडकरी म्हणाले- ग्रामीण, कृषी अर्थव्यवस्थेचा विकास साखर कारखानदारीने झाला. पण तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात. आज साखरेचे अतिरिक्त उत्पादन होत असल्यामुळे ही कारखानदारी अडचणीत आली आहे. इथेनॉल आणि ग्रीन पॉवरच्या निर्मितीमुळे ही कारखानदारी परवडणारी होणार आहे. कृषी क्षेत्राने आता ऊर्जानिर्मिती, जैविक इंधन निर्मिती या क्षेत्राकडे वळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.
आपण 80 टक्के आयातीवर अवलूंबन आहोत. जोपर्यंत ही आयात कमी होणार नाही, तोपर्यंत आपण आत्मनिर्भरतेकडे जाणार नाही, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- जैविक इंधन निर्मितीमुळे ग्रामीण भाग, शेतकरी, मजूर संपन्न होईल. मोठ्या प्रमाणावर क्रांती यामुळे होणार आहे. क्रूड ऑईलची 8 लाख कोटींची आयात आज करावी लागत आहे. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. मानवी जीवन संकटात सापडले आहे. याचा विचार करता इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजी या इंधनाची निर्मिती शेतकरी करणार. वाहने जैविक इंधनावर चालतील, संपूर्ण वाहतूक या इंधनावर येईल. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल. रोजगार निर्माण होईल. शहराकडून लोक पुन्हा गावाकडे वळतील आणि कार्व्हर सारखे परिवर्तन भारतात होईल. भारत सुखी, संपन्न व समृध्द होईल. जैविक इंधनाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींची होईल व 1 कोटी तरुणांना रोजगार मिळतील व देश आत्मनिर्भर होईल, असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार