सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकर्‍यांना अधिक उत्पादन देणारे व रोगमुक्त बियाणे मिळावेत : ना. नितीन गडकरी

शेतकर्‍यांना अधिक उत्पादन देणारे व रोगमुक्त बियाणे मिळावेत : ना. नितीन गडकरी ‘क्रॉप हेल्थ मॅनेजमेंट अ‍ॅन इंडियन स्टोरी’ पुस्तकाचे विमोचन

Snehal Joshi .
  • Dec 1 2020 4:24PM
आपल्या देशातील शेतकर्‍यांच्या पिकाचे उत्पादन वाढावे यासाठी अधिक उत्पादन देणारे व रोगमुक्त बियाणे मिळावेत. तसेच उत्पादकता वाढून खर्च कमी केल्यासच शेती सक्षम आणि परवडणारी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
डॉ. सी. डी. मायी यांच्या ‘क्रॉप हेल्थ मॅनेजमेंट अ‍ॅन इंडियन स्टोरी’ या पुस्तकाचे व्हिडिओ कॉन्फसन्सच्या माध्यमातून ना. गडकरी यांनी विमोचन केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- रोगमुक्त बियाणे मिळणार नाही, तोपर्यंत शेतकर्‍याच्या कमी उत्पादनाची समस्या कायम राहील. यासाठी रोगमुक्त बियाण्यांपासून प्रयोगशाळेत रोप तयार करून शेतकर्‍यांना दिले जावे. रोग नियंत्रणात ठेवले जावे अन्यथा अपेक्षित उत्पादन मिळणार नाही.
रासायनिक कीटकनाशक व खते यांच्या दुष्परिणामांची आता शेतकर्‍यांनाही कल्पना येत आहे. जगातही यासंदर्भात जागरूकता निर्माण होत असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या किंमती खूप जास्त आहेत. त्यामुळे खर्च अधिक होतो. उत्पादनाच्या तुलनेत हा खर्च परवडणारा नसतो. पिकांच्या आरोग्याबााबत जमिनीच्या तपासणीचा विचारही महत्त्वाचा आहे. जमीन आणि  पाण्याची तपासणी करून दोन्हीचा अहवाल शेतकर्‍याकडे असावा. वैज्ञानिकदृष्ट्या या बाबींचा अभ्यास व्हायला पाहिजे. पिकाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हे महत्त्वाचे ठरते. सेंद्रीय शेती ही यासाठी पर्याय ठरते.
नवनिर्मिती, उद्यमशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य आणि यशस्वी प्रयोग याच्या आधारे शेती केल्यास खर्च कमी, उत्पादन अधिक, या पध्दतीने शेती करावी लागेल, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार