सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘टू व्हिलर टॅक्सी’ रोजगार निर्मितीची नवीन वाट : नितीन गडकरी

‘टू व्हिलर टॅक्सी’ रोजगार निर्मितीची नवीन वाट : नितीन गडकरी एफएडीए गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांशी संवाद

Snehal Joshi .
  • Nov 30 2020 12:13AM
कोरोनामुळे सर्वच औद्योगिक व अन्य क्षेत्रांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. अशा स्थितीतही
ऑटोमोबाईल क्षेत्राने मात्र चांगली कामगिरी केली ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात ‘टू व्हिलर टॅक्सी’ ही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल, असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
एफएडीए गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी यांनी संवाद साधला. या कार्यक्रमात बोलतान ते पुढे म्हणाले- टू व्हिलर टॅक्सीला इलेक्ट्रॉनिक मीटर लावून टॅक्सी म्हणून चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे कुणालाही पैसा कमावता येणार आहे. एकट्या व्यक्तीला बस, रेल्वे स्टेशनवर पोहोचवाचे असल्यास ही टॅक्सी सुविधा अत्यंत फायदेशीर ठरेल. टॅक्सी चालकाला रोजगार आणि प्रवाशाला स्वस्तात आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचता येणार आहे.
आपल्या देशात सार्वजनिक वाहतूक अपेक्षेइतकी यशस्वी झाली नाही. काही भागात यशस्वी झाली आहे. पण ती डिझेलमुळे परवडत नाही, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- सार्वजनिक वाहतुकीसाठ़ी जैविक इंधन- इथेनॉल, मिथेनॉल, सीएनजी, बायो सीएनजीचा वापरच अधिक फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय ट्रॉली बसेसचा वापर केला तर कमी खर्चात प्रवास संभव आहे. इलेक्ट्रिक इंधन हे अत्यंत स्वस्त पडणारे इंधन आहे. डिझेल आणि पेट्रोलसाठ़ी आज जैविक इंधनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
जवळपासच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी ना. गडकरी यांनी ब्रॉड गेज मेट्रोचा पर्याय समोर आणताना सांगितले की, हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे. केवळ 5 केाटी रुपये प्रति किलोमीटर खर्च या प्रकल्पाला येणार आहे. रेल्वेच्याच सुविधा वापरून नागपूर अमरावती, नरखेड, वडसा, गोंदिया, रामटेक, छिंदवाडा अशा ठिकाणी ब्रॉडगेज मेट्रोतून प्रवास करता येईल. 160 किमी प्रतितास आणि एसीची सुविधा असलेली मेट्रो जनतेला प्रवासासाठी यशस्वी ठरेल.
ऑटोमोबाईल क्षेत्राने कोरोना काळातही उत्तम कामगिरी केली आहे. असे असले तरी वाहनांचे अनेक सुटे भाग आज आयात करावे लागतात. आयात करण्यात येणार्‍या साहित्याला पर्याय निर्माण करून ते देशातच तयार झाले पाहिजे व ही आयात थांबली पाहिजे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- वाहतुकीचे चांगले धोरण आम्ही लवकरच आणणार आहोत. या सर्व प्रयत्नांतून रोजगारनिर्मिती कशी अधिक होईल, यासाठी प्रयत्न राहणार आहे. न्यू मोटर व्हेईकल अ‍ॅक्ट पास झाला असून त्याची अमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे. अपघात नियंत्रणावर होत असलेल्या उपाययोजनाही त्यांनी यावेळी सांगितल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार