सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोमय क्लस्टर उभारण्यासाठी ग्रामायण प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा नितीनजी गडकरी यांचे आवाहन

ग्रामायण च्या वतीने गोमय क्लस्टर तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, एम एस एम ई त्याला पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन श्री नितींजी गडकरी यांनी ग्रामायण कार्यकर्त्यांना आज दिले.

Snehal Joshi .
  • Nov 17 2020 12:01AM
डास किंवा बारीक किडे प्रतिरोधक एखादे उत्पादन गोमय आणि गोमुत्रापासून तुम्ही तयार करा त्याला खूप मोठे मार्केट आहे. लोकं सातत्याने ते घेतील आणि लक्षावधी रुपये शेतकऱ्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येतील. मात्र हे उत्पादन सगळ्या कसोटीवर खरे उतरणारे असावे, असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. यासाठी संशोधनावर भर द्यावा. वेगवेगळ्या तज्ञ मंडळींचे सहकार्य घ्यावे आणि समाज तुमच्या वस्तू घेईल अशी मागणी असणारी उत्पादनं तयार करावी, असे ते म्हणाले ग्रामायण प्रतिष्ठान च्या वतीने ग्रामायण कामधेनू गिफ्ट ह्याम्पर केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांना आज त्यांच्या घरी जाऊन भेट देण्यात आले. श्री अनिल सांबरे यांनी कामधेनु गिफ्ट पेपर मधील वेगवेगळ्या वस्तूंची माहिती श्री गडकरी यांना दिली आणि या कामधेनु योजनेला समाजाचा चांगला प्रतिसाद मिळाला उत्साह वाढविणारा प्रतिसाद मिळाला, असे सांगितले. ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अनिल सांबरे, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत रागीट, सौ अनुराधा सांबरे ,मंजुषा रागीट,श्री रमेश जी लालवाणी, श्री राजेंद्र काळे, श्री प्रशांत बुजोणे श्री प्रसाद बर्वे श्री श्रीनिकेत सांबरे यावेळी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार