सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुखी, संपन्न, शक्तिशाली समाज निर्मिती म्हणजेच आत्मनिर्भर भारत : ना. गडकरी

सहा महिन्यात मनपाची सर्व वाहने सीएनजीवर आणा जैविक इंधनाचा वापर करणे व इंधनात स्वयंपूर्ण होणे हाही आत्मनिर्भरतेचा एक मार्ग असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- येत्या 6 महिन्यात महापौरांच्या वाहनांपासून कचरा गाड्यांपर्यंत सर्व वाहने सीएनजी इंधनात रुपांतर करण्याचा प्रयत्न करा. सीएनजीसाठी लागणारे सीएनजी फिलींग सेंटरही उभे करा. एवढेच काय, शहरातील ऑटोही सीएनजीवर चालले तर एका ऑटोचालकाला आजच्या तुलनेत 500 रुपये अधिक मिळतील. तसेच सेंद्रीय खत निर्मिती घरच्या घरी करता येईल. ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवून शहरात प्रायोगिक तत्त्वावर 25 हजार घरांपर्यंत घरगुती कचर्‍यातून सेंद्रीय खत निर्माण होईल, असा प्रयत्नही केला जावा. अशा लहान लहान उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल व तरुण स्वावलंबी होतील. हीच आत्मनिर्भर भारताची संकल्पना असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

Snehal Joshi .
  • Nov 9 2020 10:51PM
समाजातील गरीब, मागास, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्माण करून त्यांना आपल्या पायावर उभे करून रोजगार उपलब्ध करून देऊन सुखी, संपन्न, शक्तिशाली करणे, त्यांचे जीवनमान बदलून टाकून अन्न, वस्त्र, निवारा मिळेल या दिशेने प्रयत्न करणे ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे. ती साकार करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या आत्मनिर्भर भारत कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या ऑनलाईन कार्यक्रमाला प्रामुख्याने खा. विकास महात्मे, आ. गिरीश व्यास, महापौर संदीप जोशी, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे, माजी आ. प्रा. अनिल सोले, अशोक धोटे व अन्य उपस्थित होते. धरमपेठ एक्स्टेंशन शिवाजीनगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- शहर आणि जिल्ह्याचे हे कार्यालय असावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुखी, समृध्द, शक्तिशाली भारत निर्माणाची कल्पना आत्मनिर्भर भारत म्हणून केली. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या संकल्पनेवर आपण सर्व जण काम करीत  आहोत. समाजातील शोषित, पीडित, शेवटच्या व्यक्तीला जोपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा मिळत नाही, तो सुखी, संपन्न होत नाही, तोपर्यंत हे काम सुरु राहणार आहे.
देशातील 115  मागास जिल्हे, ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास हे आपले पहिले प्राधान्य असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- ग्रामीण व मागास भागात आज बेकारी, भूकमरी, गरिबी आढळते. शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या सोयींपासून लोक वंचित आहेत. त्यांना सुखी, संपन्न व शक्तिशाली करणे म्हणजेच आत्मनिर्भर भारत निर्माण करणे होय. गरिबीमुळे ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहराकडे येतात व शहरातील समस्या जटिल होतात. यापेक्षा ग्रामीण भागात त्यांच्या गावातच त्यांना रोजगार उपलब्ध झाला, तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत. यासाठी ग्रामीण भागातील हस्तकला, हातमाग, हस्तकलेचे उद्योग, कुटीर उद्योग यांचा विकास करून गावातील उद्योगांना मजबूत करणे, विकास करणे आवश्यक आहे. शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येकी 10 हजार तरुणांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकू काय, यासाठी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. सेवेचे आणि विकासाचे राजकारण करून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करा, असेही ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार