सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अपघात-नियंत्रणासाठी प्रत्येक राज्याने तामिळनाडू पॅटर्न राबवावा : ना. गडकरी

अपघात-नियंत्रणासाठी प्रत्येक राज्याने तामिळनाडू पॅटर्न राबवावा : ना. गडकरी ‘वे टू व्हिजन झिरो’ या विषयावर संवाद

Snehal Joshi .
  • Nov 4 2020 11:52PM
अपघातात बळी जाणार्‍यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. जीवन वाचविणे हे महत्त्वाचे असून त्यासाठी कितीही खर्च लागला तरी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहे. यासाठी जागतिक बँक आणि एडीबी सहकार्याने 7000 कोटी खर्चाच्या उपाययोजना करण्यात येेतील. तामिळनाडू सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी राबविलेली योजना प्रत्येक राज्याने राबवावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘वे टू व्हिजन झिरो’ या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी यांनी सांगितले की, आज 5 लाख अपघातांचा सामना दरवर्षी करावा लागतो. यात 18 ते 25 वयोगटातील तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आमच्यासाठी हे दुर्दैवी असून येत्या 2030 पर्यंत अपघातांमध्ये 50 टक्के नियंत्रण आणण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.
अपघातांच्या नियंत्रणासाठी व मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी रस्त्यांचे डिझाईन महत्त्वाचे आहे. रस्ते दुरुस्ती करून अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आतापर्यंत महामार्गांवरील एक हजार अपघात स्थळांचे निर्मूलन महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.  राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील अपघात स्थळांचा शोध घेण्यासाठी जिल्हास्तरीय एका समितीचे गठन करण्यात येत आहे. ही समिती अपघातस्थळांचा शोध घेऊन प्राधिकरणाला कळविणार आहे. विविध तांत्रिक प्रणालींचा अवलंब करून अपघात आणि बळींच्या संख्येवर नियंत्रण आणावे लागणार आहे.
‘व्हेईकल फिटनेस’ हेही अपघात नियंत्रणासाठी महत्त्वाचे आहे. जीवन वाचविण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करणार असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आज 22 लाख वाहन चालकांची देशाला गरज आहे.  वाहन चालक प्रशिक्षण केंद्रे आदिवासी, मागास भागात सुरु केली तर प्रशिक्षित चालक मिळतील आणि रोजगार निर्माण होईल. राज्य शासनाच्या अखत्यारीतील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती खराब आहे. रस्ते चांगले करावे लागतील. नवीन तंत्र आणि नवीन संशोधनाचा रस्ते बांधकामाच्या क्षेत्रात वापर करून कमी किंमतीत चांगल्या दर्जाचे रस्ते निर्माण होऊ शकतात. तसेच माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत वाहतूक प्रणालीचा उपयोग केल्यास अपघातांवर नियंत्रण येऊ शकते. वाहन वेग मर्यादा हा भागही महत्त्वाचा आहे. रस्त्यांची स्थिती कशी आहे, हे पाहून वाहन वेग मर्यादा ठरविली गेली पाहिजे. तसेच जीवन वाचविण्याच्या दृष्टीने महामार्गांवर रस्त्याच्या शेजारी अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध झाली तर जीवन वाचविता येणार आहे. प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने जैविक इंधन वापर बंधनकारक करणे आवश्यक असल्याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार