सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बोगदे बांधताना दर्जा आणि सुरक्षेशी समझोता नको : नितीन गडकरी

बोगदे बांधताना दर्जा आणि सुरक्षेशी समझोता नको : नितीन गडकरी ‘एडीटी अ‍ॅण्ड पी फॉर पीआय विथ एसएफटीई’ विषयावर संवाद

Snehal Joshi .
  • Nov 3 2020 12:06AM
आगामी काळात बोगदे बनविणारा तज्ञ देश म्हणून आपली ओळख जगात व्हावी. तसेच बोगदे बनविताना दर्जा आणि सुरक्षेशी कोणताही समझोता न करता प्रकल्पावर होणार्‍या खर्चात बचत करण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
‘अ‍ॅडव्हान्स डिजिटल टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड पॉलिसी फॉर इन्फास्ट्रक्चर विथ स्पेशल फोकस ऑन टनेल इंजिनीअरिंग’ (एडीटी अ‍ॅण्ड पी फॉर पीआय विथ एसएफटीई) या विषयावर बांधकाम क्षेत्रातील कंत्राटदारांशी ना. गडकरी संवाद साधत होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज संपन्न झाला. शासनाचे अन्य विभाग, राज्य शासन वगळता केवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून येत्या काळात सुमारे 1 लाख कोटींचे बोगदे बांधकाम होऊ शकते असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातही दर्जात्मक सुधारणा केल्या जात आहे. शक्य तेवढा अधिक उच्च तंत्राचा वापर केल्या जातो. नुकताच शुभारंभ झालेल्या जोजिला या बोगद्याच्या कामात आम्ही जनतेचे 5 हजार कोटी कंत्राटदार, विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तंत्रज्ञ यांच्यामुळे वाचविणे शक्य झाले. कामाच्या दर्जाशी आणि सुरक्षेशी कोणताही समझोता न करता हे शक्य झाले आहे.
बोगद्यामध्ये विविध कामांसाठी चालणार्‍या मशिनी या डिझेलवर चालतात. जनरेटर डिझेलवर चालते. त्या आता जैविक इंधन असलेल्या इथेनॉल, मिथेनॉलवर चालल्या, तर प्रकल्पाची किंमत अधिक कमी करता येईल. तसेच बोगद्यासाठी खोदकाम करताना निघणारे ‘मटेरियल’ तेथेच वापरले गेले पाहिजे. भविष्यात बोगदा बांधताना प्रकल्पाच्या किंमतीत बचत करणे आवश्यक आहे. स्टील ऐवजी स्टील फायबर वापरता येईल काय, याचाही विचार केला गेला पाहिजे. स्वत:चे घर बांधताना जो दृष्टिकोन आपण ठेवतो तसा सकारात्मक दृष्टिकोन प्रकल्प किंमत कमी करण्यासाठी कंत्राटदार, अभियंत्यांनी ठेवावा, म्हणजे प्रकल्पाच्या किमती कमी करणे शक्य होईल.
प्रकल्पाचे बांधकाम करताना शेजारच्या जमिनीचा विकास कसा करता येईल. पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे शक्य असेल तर तो विचारही केला गेला पाहिजे, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- उच्च तंत्र, पारदर्शकता, नियोजित वेळेपूर्वी प्रकल्प पूर्ण करणे, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, डिजिटलायझेशन आदींचा वापर करणे आवश्यक झाले आहे. भारतीय कंत्राटदार, अभियंते, तांत्रिक सल्लागार जागतिक स्पर्धेत सहभागी व्हावे आणि जगात पहिल्या क्रमांकावर यावे असे चित्र निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार