सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संतांमुळे आमचे सामाजिक, सांस्कृतिक जीवन प्रगल्भ आणि समृध्द : ना. गडकरी

संतांमुळे आमचे सामाजिक, सांस्कृतिक जीवन प्रगल्भ आणि समृध्द : ना. गडकरी विश्व वारकरी सेवा संस्थेच्या मोबाईल अ‍ॅप व वेबसाईचे लोकार्पण

Snehal Joshi .
  • Oct 27 2020 11:28PM
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इतिहास, संस्कृती, परंपरा ही आमची सर्वात मोठी शक्ती. ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज यांनी या भूमीला सांस्कृतिक वारसा दिला आहे. तुकडोजी महाराज यांनी लोकशिक्षण व लोकप्रबोधनाचे सुंदर उदाहरणच प्रस्तुत केले आहे. संतांमुळेच आमचे सामाजिक, सांस्कृतिक जीवन प्रगल्भ आणि समृध्द व संपन्न झाले आहे, असे विचार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
विश्व वारकरी सेवा संस्थेच्या मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाईटचे लोर्कापण ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलत होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हेही याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी पुढे म्हणाले- माधानला संत गुलाबराव महाराज हे असामान्य विद्वत्ता असलेले संत होते. अंध असूनही त्यांनी सर्व विषयांचा अभ्यास केला. त्यांच्या साहित्यावर आज पीएच. डी. केली जाते. वारकरी हेही संतांच्या भूमिकेतील त्यांचा विचार माानवांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. ‘जुने ते सोने’ हे खरे आहे पण काळाच्या ओघात आपण बदलले पाहिजे. तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. आपली विचारधारा, साधू संत यांना बरोबर घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ती कशी प्रसारित करता येईल, हे आपल्या समोरील आव्हान आहे, असेही ते म्हणाले.
ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करावे हे मी नेहमी सांगत असतो, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- लोकप्रबोधन, लोकसंस्कार आणि लोकप्रशिक्षण या त्रिसूत्रीवर आमचा सांस्कृतिक वारसा अवलंबून आहे. विश्व वारकरी संस्था चांगले काम करीत आहे. उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करीत असल्याबद्दल मला आनंद आहे. संतांचे साहित्य, संतांचे विचार, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, ग्रामगीता, भक्तिमार्ग पुढच्या पिढीपर्यंत नि:स्वार्थ भावनेने पोहोचवण्याचे काम वारकरी संप्रदाय, तंत्रज्ञानाचा उपयोग करून करीत आहे, याचा मला अधिक आनंद असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार