सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

त्रिपुरातील राष्ट्रीय महामार्गांच्या 9 परियोजनांचा कामांचा ना. गडकरींच्या हस्ते शुभारंभ

त्रिपुरातील राष्ट्रीय महामार्गांच्या 9 परियोजनांचा कामांचा ना. गडकरींच्या हस्ते शुभारंभ त्रिपुराच्या अर्थव्यवस्थेला मिळणार चालना

Snehal Joshi .
  • Oct 27 2020 11:09PM
त्रिपुरातील राष्ट्रीय महामार्गांच्या 9 परियोजनांच्या कामांचा शुभारंभ आज भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. या सर्व योजनांचे कोनशिला अनावरण आज करण्यात आले. महामार्गांच्या या योजनांमध्ये त्रिपुराचे चित्र बदलणार असून अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे ना. गडकरी याप्रसंगी म्हणाले.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री जन. व्ही. के. सिंग, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग, खासदार, आमदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्रिपुरात आज शुभारंभ झालेल्या 2752 कोटी रुपये खर्चाच्या 262 किमीच्या 9 महामार्गांच्या योजनांचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- याशिवाय यावर्षी काम पूर्ण होणार्‍या योजनाही त्रिपुराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. आज शुभारंभ झालेल्या महामार्गांमुळे आंतरराज्यीय आणि बाांगला देशपर्यंत संपर्क करता येणार आहे. राज्याचे पर्यटन क्षेत्र मजबूत करण्याच्या दृष्टीने एक प्रगतीचा मार्ग खुला झाला असल्याचेही ते म्हणाले.
महामार्गांच्या या नऊ योजनांमुळे सामाजिक व आर्थिक प्रगती होण्यासाठी व अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- नवीन 367 किमीच्या 4 योजनांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. या योजना 7523 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात येतील. येत्या डिसेंबरपर्यंत या कामाचे प्रकल्प अहवाल तयार होऊन आगामी वर्षात या कामांचीही सुरुवात होईल. याशिवाय एनएचआयडीसीएल त्रिपुरात पार्किग प्लाझा आणि बसपोर्टचे कामही करीत आहे. त्रिपुरातील ट्रक आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिथेनॉलवर रुपांतरित करण्यात आली तर वाहतूक खर्चात बचत होईल आणि प्रवाशांना स्वस्त आणि एअर कंडिशन बसमध्ये प्रवास करता येईल. याशिवाय वायू प्रदूषण होणार नाही व पर्यावरणाचे संरक्षण करता येईल. तसेच त्रिपुरातील बांबू सर्व देशात उद्योगांना पुरवठा करता येईल काय, याचा विचारही त्रिपुरा सरकारने करावा. त्रिपुराचा औद्योगिक, आर्थिक, शैक्षिणक, सामाजिक, आरोग्य दृष्टीने, कृषी क्षेत्राचा विकास होईल असे 2050 पर्यंतचे एक ‘व्हिजन डॉक्युेमेंट’ तयार करण्यात यावे. ते प्रत्यक्षात साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शासन सर्व प्रकारची मदत त्रिपुराला करेल असे आश्वासनही ना. गडकरी यांनी यावेळी दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार