सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विश्राम जामदार कर्मठ स्वयंसेवक : नितीन गडकरी

लघु उद्योग भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, व्हीएनआयटीचे अध्यक्ष विश्राम जामदार हे रा.स्व. संघाचे कर्मठ स्वयंसेवक होते. विविध संस्थांमधून काम करताना त्यांनी एक आदर्श निर्माण केला, अशा भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.

Snehal Joshi .
  • Oct 27 2020 10:40PM
लघु उद्योग भारतीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, व्हीएनआयटीचे अध्यक्ष विश्राम जामदार हे रा.स्व. संघाचे कर्मठ स्वयंसेवक होते. विविध संस्थांमधून काम करताना त्यांनी एक आदर्श निर्माण केला, अशा भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.
विश्राम जामदार यांच्या निधनानिमित्त आयोजित श्रध्दांजली सभेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी या सभेला उपस्थित होते. ते पुढे म्हणाले- प्रिय व्यक्ती
सोडून गेले याचे मला अधिक दु:ख आहे. विविध संस्थांमध्ये काम करताना आणि अभाविपचे काम
करताना त्यांचा माझा घनिष्ठ संबंध आला. त्यांचे व माझे पारिवारिक संबंधही होते. विश्राम जामदार  यांची प्रकृती पाहता ते जाऊ शकतात असे वाटत नव्हते. विविध संस्थांमध्ये काम करताना त्यांची कटिबध्दता होती. प्रकृती अस्वास्थ्याच्या संकटातून ते बाहेर येतील असे वाटले होते, पण तसे झाले नाही. त्यांच्यासारखे कर्मठ, कटिबध्द स्वयंसेवक निर्माण करून त्यांची पोकळी भरून काढली जावी, हीच त्यांना श्रध्दांजली ठरेल, असेही ना. नितीन गडकरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार