सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कॉफी टेबल बूकचे ना. गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन

खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या कॉफी टेबल बूकचे ना. गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन

Snehal Joshi .
  • Oct 23 2020 11:27PM
नागपूरकरांसाठ़ी मनोरंजनाचा दिमाखदार नजराणा ठरलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाची ठळक वैशिष्ट्ये सांगणार्‍या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन आज केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले.
ना. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला आ. व खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, सुप्रसिध्द कवी व समितीचे उपाध्यक्ष प्रो. मधुप पांडेय, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष राजेश बागडी, सदस्य- बाळ कुळकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, प्रसन्न अटाळकर, अभय दीक्षित उपस्थित होते.
प्रकाशनाच्या या सोहोळ्यानंतर ना. गडकरी यांनी कॉफी टेबल बूकचे कौतुक केले. याप्रसंगी ना. गडकरी म्हणाले- कोरोनामुळे नागरिकांच्या मनावर परिणाम झाला आहे. ज्यांना या आजारातून जावे लागले, ते अनेकजण भीतीमुळे मानसिकदृष्ट्या खचले आहेत. पुढच्या काळात सर्वसामान्याचे मनोबल उंचावण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी रामायण, महाभारत, गौतम बुध्द, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, लोकमान्य टिळक, ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या माध्यमातून लोकांमधील नैराश्य दूर करण्याचे काम करण्याची गरज आहे.
गेल्या तीन वर्षांपासून खासदार सांस्कृतिक महोत्सवाने नागपूरकरांच्या हृदयात स्थान मिळविले आहे. आपल्या शहराचाच एक वार्षिक उत्सव म्हणून त्याकडे बघितले जाते. दिग्गज कलांवंताची उपस्थिती आणि स्थानिक कलावंतांना व्यासपीठ हे महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. तीन वर्षातील सर्व क्षण एकत्र आणून तो कायमस्वरूपी ठेव्याच्या रुपात जतन व्हावा, या उद्देशाने या कॉफी टेबल बूकची निर्मिती करण्यात आली आहे.
या महोत्सवात सलमान खान, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, गायक अभिजित, सुप्रसिध्द कवी कुमार विश्वास यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांनी गेल्या तीन वर्षात महोत्सवाला हजेरी लावली आहे. याशिवाय ‘चला हवा येऊ द्या’ची टीम, तसेच हास्य कविसंमेलनाने नागपूरकरांना खदखदून हसविले आहे. कितीही गर्दी झाली तरी प्रत्येक नागपूरकराला या महोत्सवाचा आनंद लुटता येईल, अशी व्यवस्था आयोजन समितीच्या वतीने केली जाते. मात्र या महोत्सवाचा महिमा नागपूरबाहेरील लोकांना कळावा, नागपुरात पर्यटनासाठी येणार्‍या लोकांपर्यंत महोत्सवाची महती पोहोचावी, यासाठी छायाचित्रे व माहितीचा संग्रह असलेले कॉफी टेबल बूक प्रकाशित करण्यात आले आहे, असे आयोजन समितीने सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार