सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संत्रा किसान रेलमुळे शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट होणार : नितीन गडकरी

संत्रा किसान रेलमुळे शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट होणार : नितीन गडकरी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ शेतकर्‍यांसाठीच्या वेबसाईटचेही उद्घाटन

Snehal Joshi .
  • Oct 17 2020 11:47PM
शेतकर्‍यांचा माल संपूर्ण भारतात विविध ठिकाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने आजपासून सुरु होत असलेल्या संत्रा किसान रेल्वेमुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होणार असून शेतकर्‍यांच्या मालासाठी नवीन सुविधा उपलब्ध होणार आहे. सर्व समस्यांवर मात करीत शेतकर्‍यांना पुढे नेण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे, यामुळे विदर्भातील शेतकर्‍याच्या आत्महत्या थांबतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
मध्य रेल्वे संत्रा किसान रेल्वेच्या वाहतुकीला  ना. गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. या प्रसंगी पालकमंत्री नितीन राऊत, खा. रामदास तडस, खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. विकास ठाकरे, महापौर संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. ही गाडी नागपूरहून सुटल्यानंतर आदर्शनगर दिल्ली येथे जाईल. दरम्यान काटोल, नरखेड, या संत्रा उत्पादन करणार्‍या गावांच्या स्टेशनवर थांबवणार आहे. शेतकर्‍याच्या मालाची वाहतूक करणारी पहिली किसान रेल्वे दानापूर येथून सुरु झाली होती. या कार्यक्रमातच शेतकर्‍यांसाठी संत्रा किसान रेल वेबसाईटचे उद्घाटनही ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना ना. गडकरी म्हणाले- रस्त्याने होणार्‍या वाहतुकीत अधिक खर्च येतो, त्या तुलनेत रेल्वेने होणार्‍या वाहतुकीत खर्चाची बचत होणार आहे. तसे फूड प्रोसेसिंग मंत्रालयाने आमच्या विनंतीनुसार संत्रा किसान रेलने जाणार्‍या मालावर 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय केला असून तसे आदेशही काढले आहे. यामुळे शेतकर्‍यांचा संत्रा, मोसंबी, निंबू व अन्य माल अत्यंत कमी खर्चात दिल्ली, अमृतसरच्या बाजारात जाईल व शेतकर्‍यांच्या मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. ज्या भागातून शेतकर्‍यांचा माल या रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध होईल, त्या भागातून रेल्वे जाईल. यामुळे रेल्वेला व्यवसाय मिळणार आहे.
मध्य रेल्वेने आता जेएनपीटीहून भाजी निर्यात करण्यासाठी कंटेनरला आवश्यक असलेली रेफ्रिजरेशनची व्यवस्थाही करून द्यावी, त्यामुळे नागपूर विदर्भातील ताजी भाजी देशात निर्यात करणे शक्य होईल व भाजीही ताजी राहील, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- वर्धा ते जेएनपीटी येथे भाजीची निर्यात केली जाणार असून रेल्वेने यासाठी सहकार्य करावे. 10 शेतकर्‍यांनी फार्मर प्रोड्यूस कंपनी तयार करून आपला संत्रा व अन्य माल एकत्रितपणे बुकिंग करून या रेल्वेने पाठवावा. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे असा प्रयत्न यातून होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, तो प्रयत्न आज प्रत्यक्षात आला आहे
विदर्भात सिंदी व जालना येथे ड्रायपोर्ट पूर्ण होत आहेत. विदर्भात आता थेट सिंदीवरून आयात निर्यात सुरु होईल. यामुळेही शेतकर्‍याचे उत्पन्न वाढणार आहे. शासनाच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचल्या तर परकीय चलनही देशात येईल, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाला विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार