सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एमएसएमईच्या भिवाडी तांत्रिक केंद्राचे उद्घाटन

तांत्रिक केंद्रातून कौशल्यासह, प्रशिक्षित मनुष्यबळ तयार व्हावे : नितीन गडकरी एमएसएमईच्या भिवाडी तांत्रिक केंद्राचे उद्घाटन

Snehal Joshi .
  • Aug 31 2020 10:33PM
उद्योगांना साहाय्य ठरणारे कौशल्यासह प्रशिक्षित मनुष्यबळ एमएसएमईच्या तांत्रिक केंद्रांमधून तयार व्हावेत. तसेच पुढे त्यांना उद्योगासाठी प्रोत्साहित केले जावे, हा उद्देश या केंद्रांचा असला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भिवाडी येथील एमएसएमईच्या तांत्रिक केंद्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करताना ते बोलत होते. देशात आणखी 15 नवीन तांत्रिक केंद्र सुरु केले जाणार आहेत. भिवाडी हे राजस्थानातील एक केंद्र असून देशातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि आदिवासी भागातही असे तांत्रिक केंद्र सुरु करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य आम्हाला दिले आहे. ते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी येत्या 5 वर्षात 2 कोटी तरुणांना कौशल्यासह प्रशिक्षित या केंद्रांतून करता आले पाहिजे. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढणार नाही, तोपर्यंत दरडोई उत्पन्न वाढणार नाही, परिणामी प्रगती व विकास होणार नाही. आज एमएसएमईचा जीडीपी 30 टक्के आहे, तो आम्ही 50 टक्क्यांवर नेणार, 48 टक्के निर्यात 60 टक्क्यांपर्यंत नेणार आणि 11 कोटी रोजगारांमध्ये 5 वर्षात 5 कोटी अधिक रोजगाराची भर घालणार असे नियोजन करण्यात आले आहे.
देशात विविध वस्तूची होणारी आयात कमी करून आयातीस पर्यायी वस्तू देशातच ÷उत्पादित झाल्या तर रोजगार वाढेल, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- कौशल्य असलेले मनुष्यबळ तांत्रिक शिक्षणातूनच प्राप्त होते. यासाठी 15 नवीन तांत्रिक केंद्र आपण सुरु करणार आहोत. तसेच सध्या असलेली केंद्रे तांत्रिकदृष्ट्या अधिक अद्ययावत करू. या केंद्रांचा दृष्टिकोन आणि दिशा काय असतील, ते ठरवावे लागणार आहे. या केंद्रांच्या माध्यमातून किती रोजगार निर्मिती होईल, हेही स्पष्ट व्हावे लागणार आहे. आज देशात इलेक्टॉनिक मशिनरींचे सुटे भाग आयात केले जातात. ते सुटे भाग देशात तयार व्हावे, यादृष्टीने तांत्रिक प्रशिक्षण या केंद्रातून दिले जाणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.
नफा मिळविणे हा या केंद्रांचा उद्देश नाही, मात्र केंद्रांचे काम, त्यांच्या देखभालीचा खर्च या केंद्रांतून निर्माण व्हावा एवढे अपेक्षित असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- विकासाचा गुणाकार करण्यात एमएसएमईची भूमिका महत्त्वाची आहे. कौशल्यासह प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण झाल्यानंतर त्यांना उद्योगांकडे वळवून प्रोत्साहन देणे ही भूमिकाही एमएसएमईची आहे. मात्र या कामांची गती वाढविणे आवश्यक आहे. या केंद्रांचे सर्व काम डिजिटलाईट करा म्हणजे पारदर्शकता आणि गती दोन्ही वाढणार आहे. हाच आत्मनिर्भरतेकडे जाणारा मार्ग असल्याचे ना. गडकरी म्हणाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार