दोन वर्षात जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गांची सर्व कामे पूर्ण करणार : नितीन गडकरी
दोन वर्षात जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गांची
सर्व कामे पूर्ण करणार : नितीन गडकरी
-गडचिरोली जिल्ह्यातील 777 कोटींच्या
महामार्गांचे उद्घाटन व लोकार्पण
-छत्तीसगड-महाराष्ट्र-तेलंगणा जोडली जाणार
-सहा वर्षात महामार्गांची लांबी 12 पट वाढली
नक्षल चळवळ आणि मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची सर्व कामे येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येतील. हा जिल्हा सुखी, समृध्द व संपन्न झाला पाहिजे हे आपले स्वप्न असून या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण भावनात्मक दृष्टीने जोडले गेलो असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
गडचिरोली जिल्ह्यातील 777 कोटींच्या महामार्गांचे उद्घाटन आणि लोकार्पण ना. गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. व्हि. के. सिंग, राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. अशोक नेते, आ. गाणार, आ. रामदास आंबटकर, आ. देवराव होळी, आ. धर्मरावबाबा आत्राम ऑनलाईन उपस्थित होते.
आजच्या उद्घाटन समारंभात निजामाबाद सिरोंचा असरली जगदलपूर हा महामार्ग 63 वरील प्राणहिता नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम 166 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले. इंद्रावती नदीवरील 248 कोटींच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले असून 630 मीटर लांबीचा हा पूल आहे. लंकाचेन राज्य महामार्ग 275 वर बेजुरपल्ली, पारसेवाडा, देवलमारी अहेरी रस्त्यावर उंच पूल बांधण्यात आला असून 8 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले. तसेच बेजुरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 26 कोटी रुपये खर्च करण्यात आले. गरंजी पुसटोला रस्ता 14 किमीचा सुधारणा करण्यासाठी 36 कोटी खर्च करण्यात आले.
तसेच कोनशिला समारंभ करण्यात आलेली कामे- नारायणपूर भामरागड आलापल्ली महामार्गावर पेरिमली नदीवर 180 मीटर पुलाची किंमत 43 कोटी रुपये, बांडिया नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामाची कोनशिला 73 कोटी रुपये, पर्लकोटा नदीवर 576 मीटर बांधकाम असलेला पुलासाठी 78 कोटी खर्च येणार आहे. कोरपना गडचांदूर राजुरा बामनी या मार्गावर वैनगंगा नदीवर बांधण्यात येणार्या पुलाची किंमत 99 कोटी रुपये. या पुलामुळे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगना ही तीन राज्ये जोडली जाणार आहेत.
या महामार्गांच्या या कामामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात आणि प्रगतीत अधिक गती निर्माण होईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- येत्या दोन वर्षात या जिल्ह्याच्या विकासाचे चित्र बदलणार आहे. सहा वर्षात जिल्हयात महामार्गांच्या लांबीत 12 पट अधिक वाढ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. वडसा देसाईगंज येथून नागपूरपर्यंत ब्रॉड गेज मेट्रो होणार आहे. त्यामुळे गडचिरोली दीड दोन तासात पोचता येणार आहे. राज्य शासनाकडे या संदर्भात ज्या अडचणी असतील त्या त्यांनी त्वरित सोडवून द्याव्या अशी विनंतीही ना. गडकरी यांनी यावेळी केली.
गडचिरोली जिल्ह्यातील 10 हजार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, असे उद्योग या भागात सुरु होऊ शकतात, असे सांगताना ना. गडकरी यांनी सांगितले की, गडचिरोलीत बांबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. बांबूचे उद्योग या जिल्ह्यात सुरु व्हावेत. यासाठी आपण मदत करण्यास तयार आहोत. केंद्रीय मार्ग निधीतील अनेक कामे अडकून पडली आहेत, त्यासाठी भूसंपादन आणि सुविधांचे स्थलांतर करण्याचा खर्च राज्य शासनाने करावा. या निधीअंतर्गत कामाची यादी राज्य शासनाने त्वरित पाठवावी, अशी सूचनाही त्यांनी ना. अशोक चव्हाण व ना. एकनाथ शिंदे यांना केली.
आज ज्या कामांचे उद्घाटन आणि कोनशिला अनावरण झाले ती कामे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अधिकार्यांनी केली असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- पुलाच्या बांधकामाच्या वेळी पुलावर पोलिस चौकीचे निर्माण करून कामे करावी लागली. तसेच दिवसाच्या वेळी उन्हामुळे नदीतील रेती गरम होत असल्यामुळे कामे करता येत नव्हती. त्यामुळे ती रात्री करावी लागायची. अधिकार्यांनी घेतलेल्या या मेहनतीबद्दल त्यांनी अधिकार्यांचे कौतुक केले आणि अभिनंदनही केले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प