सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सेंद्रीय शेतीमालाला अधिक पसंती : नितीन गडकरी

सेंद्रीय शेतीमाल आणि भाजीपाल्याला लोकांची अधिक पसंती आणि मागणी आहे. पण सेंद्रीय शेती परवडणारी आहे काय, यावर यशस्वी प्रयोग व्हावे. यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षित करण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठीही वेदकृषीने पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Snehal Joshi .
  • Aug 17 2020 11:39PM
सेंद्रीय शेतीमाल आणि भाजीपाल्याला लोकांची अधिक पसंती आणि मागणी आहे. पण सेंद्रीय शेती परवडणारी आहे काय, यावर यशस्वी प्रयोग व्हावे. यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षित करण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठीही वेदकृषीने पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
वेदकृषीच्या वेबसाईटचे ई उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले- शेतीसाठी रासायनिक खते व औषधांचा अधिक वापर केला जात असून हा वापर खर्चिक आहे. त्याऐवजी सेंद्रीय खतांचा वापर करून पिके घेणे आवश्यक आहे. पण सेंद्रीय शेती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे काय, यावर अभ्यास करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. वेदकृषी परिवाराचे काम चांगले आहे,असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगाराच्या अधिक समस्या आहेत. यावर मार्ग शोधण्याची हीच वेळ आहे. कृषी-ग्रामीण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या कच्च्यामालावर आधारित लहान लहान उद्योग उभे राहू शकतात. आयातीला पर्याय आणि प्रदूषणरहित म्हणून जैविक इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल ग्रामीण भागातच उपलब्ध आहे. जेट्रोफा, करंज, साल, रतनज्योत, टोळ यापासून जैविक इंधन मिळवून त्याचा वापर यशस्वी ठरला आहे. धानाच्या तणसापासून बायो सीएनजी मिळवून ते इंधन सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रभावी आणि इंधनाच्या खर्चात बचत करणारे ठरले आहे. नागपुरात बायो सीएनजीवर 80 बस चालविण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार