सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद जैविक इंधनात : नितीन गडकरी

सार्वजनिक व खाजगी वाहतूक ही जैविक इंधनावर आणि इलेक्ट्रिकवर पूर्णपणे सुरु झाली तर अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद जैविक इंधनात आहे. भविष्यात याकडे आपल्याला जावेच लागणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक व परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Snehal Joshi .
  • Aug 17 2020 11:21PM
देशात विविध प्रकारांनी जैविक इंधन निर्मितीचे तंत्र उपलब्ध आहे. धानाच्या तणसापासून इथेनॉल, बायो सीएनजी निघू शकतो, आसाममध्ये मिथेनॉल उपलब्ध आहे. सार्वजनिक व खाजगी वाहतूक ही जैविक इंधनावर आणि इलेक्ट्रिकवर पूर्णपणे सुरु झाली तर अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद जैविक इंधनात आहे. भविष्यात याकडे आपल्याला जावेच लागणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक व परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मणिपूर येथेील राष्ट्रीय महामार्ग परियोजनेचा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शिलान्यास करण्यात आला व एका प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग व अन्य केंद्रीय मंत्री, मणिपूरचे मंत्री व खासदार आणि आमदार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार उत्तरपूर्व भारतात पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले आहे, असे सांगताना ना. नितीन गडकरी म्हणाले- मणिपुराताही आगामी काळातही मोठ्या प्रमाणात नवीन प्रकल्प घेतले जाणार असून सध्या सुरु असलेले प्रकल्पही महत्त्वपूर्ण आहेत. भविष्यात होणार्‍या प्रकल्पासाठी राज्य शासनाने काही अडचणी सोडवून देण्यास मदत करावी व भूसंपादन करून द्यावे अशी सूचनाही ना. गडकरी यांनी केली.
उत्तर पूर्व भारत जलमार्गाच्या माध्यमातून अधिक संपर्कात आणणे शक्य असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- जलमार्गाची वाहतूक अत्यंत स्वस्त आहे. या वाहतुकीसाठीही मिथेनॉलचा वापर झाला तर वाहतुकीसाठी होणार्‍या खर्चात अधिक बचत होईल. उत्तरपूर्व राज्यांमध्ये सार्वजनिक बस, ऑटो, मरीन इंजिन जैविक इंधनावर कशी चालतील, याचा विचार राज्याने केला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक जैविक इंधनावर सुरु व्हावी असे आपले प्रयत्न आहेत. यासाठी नवीन तंत्राचा उपयोग करून ते यशस्वी करता येईल. धानाच्या तणसापासून बायो सीएनजी तयार करून बस चालू शकतात, हा प्रयोग यशस्वी झाला आहे. पेट्रोल-डिझेल हटवून ग्रीन मणिपूर बनवता येऊ शकते. यासोबतच सेंद्रीय शेतीचा प्रयोग केला पाहिजे. नवीन योजना आपण तयार कराल तर उत्तर पूर्व भागाचा शाश्वत विकास होईल, असेही ते म्हणाले.
दुचाकी टॅक्सीसाठी शासनाने परवानगी दिल्याचे सांगून ना. गडकरी यांनी सांगितले की, जैविक इंधनावर किंवा इलेक्ट्रिकवर चालणारी दुचाकी टॅक्सी एका प्रवाशासाठी उपयोगात येऊ शकते. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. महामार्गाची कामे, जलमार्ग, विमानतळ, रेल्वेचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. पाणी, वीज वाहतूक आणि संवाद माध्यमे ज्या भागात असतील तेथेच उद्योग येतील व त्या परिसराचा विकास होईल, असेही ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार