सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिला उद्योजिकांना बाजार उपलब्ध व्हावा : नितीन गडकरी

स्वदेश बाजारने या महिलांना ऑनलाईन मार्केट उपलब्ध करून द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्वदेश बाजार ऑनलाईन पोर्टलचे ई उद्घाटन करताना ते बोलत होते.

Snehal Joshi .
  • Aug 16 2020 7:49PM
देशातील महिला बचत गट आणि महिला उद्योजिका अनेक चांगल्या वस्तूंचे उत्पादन करीत आहेत. त्यांना बाजार उपलब्ध होत नाही. स्वदेश बाजारने या महिलांना ऑनलाईन मार्केट उपलब्ध करून द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
स्वदेश बाजार ऑनलाईन पोर्टलचे ई उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- उत्पादित वस्तूंचा दर्जा, आकर्षक पॅकेजिंग, वेळेत सेवा या सुविधा मिळाल्या तर ई मार्केटवरही त्या वस्तूंना बाजारात चांगली मागणी असते. अ‍ॅमेझान हे करू शकले तर आपणही ते करू शकलो पाहिजे. आजही कृषी मालावर आधारित चांगल्या दर्जाच्या उत्पादनांना मागणी आहे. विशेषत: लहान व्यवसाय-उद्योग करणार्‍या महिलांना स्वदेशमुळे बाजार उपलब्ध होईल. ग्रामीण भागातील कच्चा मालाचा उपयोग करून दर्जेदार उत्पादन घेणे शक्य आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पादनाला मार्केट मिळेल. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्चात बचत करता येणे शक्य आहे. आपले उत्पादन जगभरात कसे प्रसिध्द होईल या उद्देशाने मेहनत करावी लागेल, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार