सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पायाभूत सुविधा आणि एमएसएमई क्षेत्रात परकीय गुंतवणूक करा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे रस्ते सुरक्षा क्षेत्रात यापूर्वीचेच सहकार्य आहे. या सहकार्यामुळे लोकांसाठी रस्ते सुरक्षा आणि जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय रस्ते सुरक्षा मूल्यमापन कार्यक्रमांतर्गत 21 हजार किमी रस्त्यांचे मूल्यांकन केले गेले असून सुमारे 3000 किमी लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण केले जात आहे.

Snehal Joshi .
  • Aug 14 2020 7:34PM
देशात निर्माण होणार्‍या पायाभूत सुविधा आणि सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांच्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि  एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटनांना केले. ऑटोमोबाईल क्षेत्र आणि एमएसएमई भारतीय अर्थव्यवस्थेचे विकास इंजिन आहेत, असेही ते म्हणाले.
रस्ते पायाभूत विकास आणि एमएसएमईत व्यापार गुंतवणूक आणि सहकार्यावरील इंडो ऑस्ट्रेलियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड वुमनइनोव्हेटर या संस्थेशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी ना. गडकरी म्हणाले- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे रस्ते सुरक्षा क्षेत्रात यापूर्वीचेच सहकार्य आहे. या सहकार्यामुळे लोकांसाठी रस्ते सुरक्षा आणि जागरूकता अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय रस्ते सुरक्षा मूल्यमापन कार्यक्रमांतर्गत 21 हजार किमी रस्त्यांचे मूल्यांकन केले गेले असून सुमारे 3000 किमी लांबीच्या रस्त्यांचे तांत्रिक उन्नतीकरण केले जात आहे. जनजागृतीमुळे या सुधारणा शक्य झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.
रस्ते सुरक्षा जनजागृती आणि उन्नतीकरणामुळे रस्त्यांवरील अपघातात 50 टक्के घट होईल. 2030 पर्यंत शून्य रस्ते अपघाताचे आमचे लक्ष्य असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी त्यांच्याच मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमासाठी जागतिक बँक आणि एडीबीने 7 हजार कोटी रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. सामाजिक जागरूकता आणि शिक्षण, आपात्कालीन सेवांमध्ये सुधारणा, वैद्यकीय विम्यावर अधिक भर, रुग्णालयाच्या सेवा अधिक उपलब्ध करणे यामुळे रस्ता सुरक्षेचे लक्ष्य गाठण्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे.  2019 चा मोटर वाहन कायदा भारतातील परिवहन क्षेत्राच्या सर्व बाबींविषयी सर्वसमावेशक कायदा आहे, असेही ते म्हणाले.
देशातील ग्रामीण, कृषी आणि आदिवासी क्षेत्राचा विकास आणि त्या भागात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले-आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेचे नेतृत्व एमएसएमई क्षेत्र करेल. विमा, निवृत्ती वेतन आणि समभाग अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि विमा क्षेत्रात गुंतवणूक खुली झाल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच एमएसएमई लवकरच भांडवली बाजारातही प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार