सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जलसंधारणाचा नितीन गडकरी पॅटर्न नीती आयोगाने स्वीकारला

जलसंधारणाचा नितीन गडकरी पॅटर्न नीती आयोगाने स्वीकारला -संपूर्ण देशात राबविणार -आयोगाने जलसंधारणाच्या कामाचे केले कौतुक -बुलढाणा जिल्ह्यात 5 लाख लोकसंख्येला दिलासा -नागपूर, मुंबई, पुणे, मराठवाड्यातही या पॅटर्नचे काम सुरु

Snehal Joshi .
  • Aug 12 2020 8:22PM
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आणि
मार्गदर्शनात  वर्धा, बुलडाणा जिल्ह्यात महामार्गाच्या बांधकामादरम्यान राबविण्यात आलेला जलसंधारण पॅटर्न नीती आयोगाने स्वीकारला असून आता संपूर्ण देशात हा पॅटर्न राबविण्याची शिफारस नीती आयोग राज्यांना करणार आहे. तसेच जलसंधारणाच्या गडकरी पॅटर्नचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ना. गडकरी यांना एक पत्र पाठवून कौतुकही केले आहे.
वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा हे एक दुर्गम भागातील आदिवासी लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावात वनखात्याच्या अधिकारक्षेत्रात नसलेल्या खडकाळ जागी तलावसदृश्य खोल खड्डे करण्यात आले. या खड्ड्यातील मुरुम आणि माती महामार्गाच्या कामासाठी घेण्यात आली. तसेच नदीनाल्यांमधील माती, रेती व मुरुम काढण्यात आला. त्यामुळे नदी नाले व खड्ड्यांचे खोलीकरण झाले. पावसाळ्यात या तलावसदृश्य खड्ड्यांमध्ये आणि नदी नाल्यांमध्ये खोलीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आणि आसपाासच्या नैसर्गिक जलस्रोतांचा पाण्याचा स्तर वाढला. परिणामी पिण्यासाठ़ी व शेतीच्या सिंचनासाठी शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध झाले.
तसेच बुलढाणा जिल्ह्यातही राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरु आहेत. या कामासाठी लागणारा मुरुम आणि माती मिळविण्यासाठी रस्त्याच्या जवळील तलाव आणि नदी-नाल्यांमध्ये खोदकाम करण्यात आले. परिणामी तलाव, नदी-नाल्याचे आपोआप खोलीकरण झाले आणि त्यात पाणीसाठा होऊ लागला. या खड्ड्यांमध्ये आता पावसाचे पाणी जमा झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे एकूण 12 प्रकल्प असून त्याची लांबी 491 किमी आहे. या लांबीच्या कामासाठी जवळच्या तलाव, नदी, नाल्यातून 65.59 लाख क्यूबिक मीटर मुरुम-माती काढण्यात आली. यामुळे 6559 टीसीएम पाणीसाठा झाला आहे व 152 गावांना याचा लाभ मिळाला.
बुलढाणा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जलसंधारणाच्या गडकरी पॅटर्नमुळे पाणीटंचाईवर मात केली गेली. सुमारे 5 लाख लोकसंख्येला पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. महामार्गासाठी करण्यात आलेल्या या खोलीकरणामुळे जमा झालेल्या पाणीसाठ्यामुळे 22 हजार 800 विहिरींना पाणी आले आणि 1525 हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. महामार्ग बांधकामासोबतच जलसमृध्दीही होऊ शकली. महामार्गाचे बांधकाम आणि तलाव, नदी-नाले खोलीकरण व रुंदीकरणाचा चांगला समन्वय यातून साधण्यात आला.
बुलढाणा तसा पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेला जिल्हा. रस्त्यांअभावीही दुर्लक्षित जिल्हा. पण ना. नितीन
गडकरी यांच्या दूरदृष्टी, नावीन्यपूर्ण कल्पना आणि मार्गदर्शनामुळे या जिल्ह्यातील 152 गावे
पाणीटंचाईमुक्त झाली आहेत. आता महामार्ग बांधकाम करताना परिसरातील नद्या, नाले, तलाव,
शेततळांचे मोफत खोलीकरण होत आहे. एक अफलातून योजना ना. गडकरी यांच्यामुळे राबविली जात असून राज्य सरकारला याबाबत कोणताही खर्च करावयास सांगण्यात येत नाही. विहिरींचे पुनर्भरण, गावे टँकरमुक्त झाली आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ताालुक्यात लांजूड सिंचन तलावाचे खोलीकरण करण्यात आले. बाळापूर, खामगाव मलकापूर चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असलेला चिखली खुर्द, चिखली बुद्रूक, लांजूड, सुजातपूर, आंबोडा, आमसरी, सुटाळा, सुटाळा खुर्द, पहुरजिरा, मोरगाव, पारखेड, पिंपरी, घाटपुरी, वाडी अशा 12 गावांमधील 42 हजारावर लोकसंख्येला पुरेल आणि 272 हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, असा 1737 टीसीएम पाणीसाठा असणारा तलाव आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे एकूण 491 किमीचे 12 प्रकल्प बुलडाणा जिल्ह्यात मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर करण्यात आलेल्या कामातून 65.59 लाख घनमीटर म्हणजे 6559 टीसीएम अतिरिक्त भूपृष्ठीय पाणीसाठा विनाखर्च निर्माण झाला आहे. त्यामुळे 10 हजार टीसीएम एवढे पाणी भूजलसाठ्यांसाठी पुनर्भरणातून होणार आहे. राज्यात विदर्भाच्या नागपूर विभागात 34 प्रकल्प, कोकणच्या मुंबई विभागात 3 प्रकल्प, पुणे विभागात 5 प्रकल्प तर मराठवाडयाच्या औरंगाबाद विभागात 18 प्रकल्प बुलडाणा पॅटर्ननुसासर राबविले जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार