सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी कल्पकता आणि उद्यमशीलता असावी : नितीन गडकरी

विचारधारेसाठी काम करायचे असेल तर कार्यकर्ता हा प्रामाणिक मार्गाने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. एक सक्षम कार्यकर्ता 100 कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहू शकतो. म्हणून कार्यकर्त्याने सनदशीर मार्गाने आर्थिक सक्षम व्हावे.

Snehal Joshi .
  • Aug 11 2020 7:26PM
आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी भाजपा कार्यकर्ता हा कल्पक आणि उद्यमशील असला पाहिजे.
आपापल्या भागातील कृषी उपजांचा उपयोग तसेच उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा सनदशीर मार्ग कार्यकर्त्यांनी अवलंबून उद्योग सुरु करावे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
विदर्भातील भाजपा कार्यकर्त्यांशी व्यापाराच्या संधी आणि एमएसएमई या विषयावर ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले- कार्यकर्त्याचा व्यक्ती म्हणून विचार केला पाहिजे. प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर कार्यकर्ता हा आर्थिकदृष्ट्या प्रामाणिकतेच्या मार्गाने सक्षम असावा. शासनाच्या अनेक योजना आहेत, या योजनांचा फायदा कसा करून घेता येईल, याचा अभ्यास करावा. कोणत्याही वस्तूचे उत्पादन करायचे असेल तर ते बाजारापेक्षा ती वस्तू स्वस्त कसे विकता येईल याचा अभ्यास करावा लागेल. विविध जिल्ह्यात कोणत्या वस्तू अधिक उपलब्ध होऊ शकतात, त्यावर प्रकल्प-उद्योग सुरु करता येईल. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात होते. या भागात तांदळापासून इथेनॉल बनविण्याचा प्रकल्प सुरु झाला तर तो आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरेल. काय तयार करायचे आणि विकायचे याबद्दल स्पष्टता असली पाहिजे असेही ते म्हणाले.
÷निर्मिती होणार्‍या वस्तूचा चांगला दर्जा, आकर्षक पॅकेजिंग, प्रामाणिकता आणि विश्वसनीयता जोपासली तर तो उद्योग यशस्वी होईल, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- वस्तू चांगली असेल तर निश्चित विकली जाईल. विशेष म्हणजे आज ज्या वस्तू आपण आयात करतो, त्या वस्तूंना पर्याय निर्माण झाला पाहिजे. बाजारात आपली वस्तू सर्वात चांगली कशी राहील याचा प्रयत्न असला पाहिजे, असेही ते म्हणाले.
आपल्या देशात मोठी बाजारपेठ आहे. भविष्यात नवीन तंत्रज्ञान, कल्पकता, संशोधन, ज्ञानविज्ञान, कौशल्य, या ज्ञानाचा उपयोग करून संपत्ती निर्माण करता आली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले- आपला कार्यकर्ता हा टाकावू नाही. त्याला नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, संस्कार मिळाले तर तो असामान्य होईल. विचारधारेसाठी काम करायचे असेल तर कार्यकर्ता हा प्रामाणिक मार्गाने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. एक सक्षम कार्यकर्ता 100 कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहू शकतो. म्हणून कार्यकर्त्याने सनदशीर मार्गाने आर्थिक सक्षम व्हावे. यावेळी एमएसएमईचे संचालक पार्लेवार, एमएसएमईचे दीप वर्मा व आ. डॉ.रामदास आंबटकर उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार