सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रोजगार निर्माण करणारा उद्योग देशासाठी महत्त्वाचा : नितीन गडकरी

देशात अधिकाधिक रोजगार निर्माणाची आवश्यकता असताना जो उद्योग मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करीत आहे, तो उद्योग देशासाठी महत्त्वाचा असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Snehal Joshi .
  • Aug 9 2020 3:25PM
कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या स्थितीत आज देशात अधिकाधिक रोजगार निर्माणाची आवश्यकता असताना जो उद्योग मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करीत आहे, तो उद्योग देशासाठी महत्त्वाचा असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
‘फिकी’तर्फे प्रायव्हेट सिक्युरिटी इंडस्ट्रीजमधील उद्योजकांशी ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- आवश्यक सेवेत या उद्योगाचा समावेश शासनाने केला आहे. कोविड दरम्यान सुरक्षा रक्षकांनी जनतेची खूप सेवा केली. कोरोनाबाधितांची सेवा
केली. त्यांची ही सेवा अभिनंदनीय आहे. खूप मोठा पसारा या उद्योगाचा असून या उद्योगात विविध क्षेत्रांचा समावेश आहे. सीसीटीव्ही, फायर फायटिंग इक्विपमेंट आदींचा या क्षेत्रात समावेश आहे. यामुळेच या क्षेत्राने मोठ्या प्रमाणात रोजगार लोकांना दिला आहे, असे ना. गडकरी म्हणाले.
या उद्योगक्षेत्राचा एमएसएमईत समावेश नसेल तर तो करता येईल काय, यावर आपण विचार करू, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- तंत्रज्ञान आता खूप पुढे गेले आहे. सुरक्षा रक्षक क्षेत्रातही बदल होत आहेत. सुरक्षा रक्षक हे क्षेत्र आता समाजाची गरज झाले आहे. एक नवीन दृष्टिकोन घेऊन या उद्योजकांना आता काम करावे लागणार आहे. येत्या 10 वर्षात हा उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी काय करावे लागेल, त्या दृष्टीने उद्योजकांनी विचार करावा. रोजगाराची खूप क्षमता या उद्योगात असून ते देशासाठी महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
सीसीटीव्हीसाठी लागणारे काही साहित्य आयात करावे लागते, या काही उद्योजकांच्या म्हणण्यावर ना.
गडकरी म्हणाले- हे साहित्य आपण भारतात बनवू शकलो पाहिजे. चीनमधून आयात करण्यात येणार्‍या
साहित्यावर आयात शुल्क वाढवता येईल. पण नवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे साहित्य आपल्या देशात बनविण्याचा प्रयत्न करावा. ते साहित्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे यासाठी प्रयत्न
झाले तर आपण निर्यातही करू शकणार आहोत. परदेशातील अनेक व्यापारी आपल्या व्यापारासाठी नवीन स्थळाच्या शोधात आहेत. अशावेळी आपणास संधी आहे. या संधीचा उपयोग आपण केला पाहिजे. आमची विश्वसनीयता लक्षात घेता हे व्यापारी आपल्याशी निश्चितपणे व्यवहार करतील असा विश्वासही ना. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
अग्निशमनासाठी लागणार्‍या साहित्याचे तंत्रज्ञान अधिक विकसित झाले पाहिजे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- महापालिकांना लागणारे आवश्यक साहित्य उपलब्ध होऊ शकत नाही, अशा वेळी खाजगी कंपन्यांकडे ते उपलब्ध असले तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. शासनाच्या अनेक योजना आहेत, या योजनांचा फायदा आपल्या उद्योग क्षेत्राने घ्यावा असे आवाहनही ना. गडकरी यांनी यावेळी केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार