सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उद्योजक बनून नोकरी देणारे व्हा : नितीन गडकरी

नवीन तंत्रज्ञान, संशोधनाचा उपयोग करून उद्योजक व्हा. आणि उद्योजकतेच्या माध्यमातून अनेकांना नोकरी द्या, रोजगार द्या, नोकरी देणारे व्हा. त्यामुळेच मागास भागाचा विकास आणि रोजगार निर्मिती

Snehal Joshi .
  • Aug 9 2020 2:56PM
नवीन तंत्रज्ञान, संशोधनाचा उपयोग करून उद्योजक व्हा. आणि उद्योजकतेच्या माध्यमातून अनेकांना
नोकरी द्या, रोजगार द्या, नोकरी देणारे व्हा. त्यामुळेच मागास भागाचा विकास आणि रोजगार निर्मिती
होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नॅशल युवा को.ऑप. सोसायटीच्या युवकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी संवाद
साधत होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- राष्ट्र सर्वोपरी ही आमची विचारधारा आहे.
मातृभूमिचा विकास हाच आमचा उद्देश. सध्याच्या काळात समाजातील नकारात्मकता दूर करून
सकारात्मक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सुशासन आणि विकास हा आत्मनिर्भरतेकडे जाणारा
मार्ग आहे. दरिद्रीनारायणाला केंद्रबिंदू मानून पुढे जाणे हे आमचे उद्दिष्ट आहे. 21 व्या शतकात ज्ञान ही
शक्ती असून ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर हे देशाचे भविष्य आहे, असेही ते म्हणाले.
प्रबळ इच्छाशक्ती व दुर्दम्य विश्वास असेल तर अशक्य काही नाही, असे सांगून ना. गडकरी म्हणाले-
आपल्या देशाची दोन भागात विभागणी झाली आहे. 65 टक्के लोक भारतात राहतात तर 35 टक्के लोक रोजगारासाठी विविध ठिकाणी स्थलांतर करतात. स्थलांतर करणारे कृषी, ग्रामीण आणि आदिवासी तसेच 115 मागास जिल्ह्यातील आहेत. या भागाचा विकासच झाला नाही म्हणून रोजगारासाठी त्यांना स्थलांतर करावे लागते. वास्तविक ग्रामीण-कृषी व आदिवासी क्षेत्रात होणार्‍या वस्तूंच्या आधारावर तेथे उद्योग सुरु होणे शक्य आहे. गाव, गरीब, शेतकरी यांचे कल्याण करायचे असेल तर पाणी, जमीन, जंगल आणि पशू यावर आधारित अर्थव्यवस्था मागास भागात उभी राहणे आवश्यक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
नवीन उद्योजकांनी तंत्रज्ञानात नवीन संशोधन करून उत्पादनाचा चांगला दर्जा, चांगले पॅकेजिंग, वेळेवर
सेवा, प्रामाणिकता व विश्वसनीयता याद्वारे पुढे यावे. रोजगार निर्मिती करून गरिबी दूर करा व ग्रामीण भागाचा विकास करा. हिंमत, सकारात्मकता ठेवून उद्यमशील व्हा, असेही ना. गडकरी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार