सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परकीय गुंतवणूकदारांसाठी भारतात गुंतवणूक ही सुवर्ण संधी : नितीन गडकरी

भारतात कोणत्याही क्षेत्रात गुंतवणुकीसाठी परकीय गुंतवणूकदारांना सध्या सुवर्णसंधी आहे. त्यांनी गुंतवणूक करावी. त्यांना आपल्या गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळू शकतो,

Snehal Joshi .
  • Aug 6 2020 6:11PM
भारतात कोणत्याही क्षेत्रात गुंतवणुकीसाठी परकीय गुंतवणूकदारांना सध्या सुवर्णसंधी आहे. त्यांनी
गुंतवणूक करावी. त्यांना आपल्या गुंतवणुकीचा योग्य परतावा मिळू शकतो, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते चर्चा करीत होते.
भारतीय अर्थव्यवस्था ही झपाट्याने प्रगतीकडे जाणारी अर्थव्यवस्था आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- कौशल्य असलेले मनुष्यबळ, उच्च आणि अद्ययावत तंत्रज्ञान, मोठी बाजारपेठ येथे उपलब्ध आहे. तसेच देशात विविध क्षेत्रातील उद्योगात विकासाची भरपूर क्षमता असताना येथे होणारी गुंतवणूक ही निश्चितपणे फायदेशीर ठरणारी आहे, हे परकीय गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे. विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये होणारी गुंतवणूक ही देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास हे शासनाचे प्राधान्य आहे. या भागात विकासाच्या आणि गुंतवणुकीसाठी खूप संधी आहेत. परकीय गुंतवणूकदारांना कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागात आपली गुंतवणूक केली तर या भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगार निर्मितीच्या क्षमता वाढतील.
याशिवाय रस्ते, पायाभूत सुविधा या क्षेत्रातही गुंतवणुकीस प्रचंड वाव आहे. अनेक परकीय कंपन्या आणि गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास आकर्षित झाल्या आहेत, असे सांगताना गडकरी यांनी सागरमाला या प्रकल्पाचे उदाहरण दिले. तसेच 22 हरित राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होत आहे. दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी असून या महामार्गाशेजारी उद्योग समूहांची निर्मिती आणि लॉजिस्टिक पार्कची निर्मिती शक्य आहे. त्यासाठी लागणार्‍या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकतात. यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यास शासन तयार असल्याचेही ना. गडकरी यांनी अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्‍यांना सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार