सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दलित, पीडित, शोषित समाज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा : नितीन गडकरी

आगामी काळात दलित, पीडित आणि शोषित समाज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा, तसेच सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या हा समाज आत्मनिर्भर व्हावा यासाठी समाजातील नेत्यांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Snehal Joshi .
  • Aug 2 2020 9:22PM
आगामी काळात दलित, पीडित आणि शोषित समाज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा, तसेच सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या हा समाज आत्मनिर्भर व्हावा यासाठी समाजातील नेत्यांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अण्णाभाऊ स्मारक ट्रस्टतर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले- अण्णाभाऊंचा दलित, पीडित-शोषित समाजात जन्म झाल्यामुळे त्यांना आलेल्या अनुभवावर आधारित लेखन त्यांनी केले होते. अण्णाभाऊंचे विचारदर्शन आजही आमच्यासाठी आदर्श आहे. या समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे. त्याशिवाय आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- समाजाला पुढे नेण्यासाठी काय करावे लागेल, याचा एक कार्यक्रम समाजाच्या

धुरिणांनी तयार करावा व या समाजाला दिशा द्यावी.
या समाजातील किती तरुण डॉक्टर होतात, किती वकील, किती इंजिनीअर, किती आयएएस होतात, हे पाहिले असता समाजाची किती प्रगती झाली हे लक्षात येईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- शिक्षणासाठी गरिबांना आपल्या पायावर कसे उभे करता येईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. शिक्षणाचा विकास झाला तर संपत्ती येईल. ज्ञानाचा संबंध संपत्तीशी असल्यामुळे पुढील काळात समाजाला स्वावलंबी बनविण्यासाठी शिक्षणाचा विकास आवश्यक आहे. अण्णाभाऊंचे जीवन समर्पित होते. त्यांचे मार्गदर्शन, साहित्य, विचार हे आमच्यासाठी संपत्तीच्या रुपाने आहे, असेही ना. गडकरी याप्रसंगी म्हणाले. यावेळी अण्णाभाऊंच्या स्मृतीला ना. गडकरी यांनी अभिवादनही केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार